ETV Bharat / city

Corruption : राज्यातील महसूल विभाग सर्वाधिक भ्रष्टाचारी - महसूल विभाग सर्वाधिक भ्रष्टाचारी

महाराष्ट्रातील विविध शासकीय विभागांपैकी महसूल विभाग हा सर्वात लाचखोर विभाग ठरला असून पोलीस खात्याचा दुसरा क्रमांक लागतो. असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागील सहा महिन्यातील प्रकाशीत केलेल्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे.

भ्रष्टाचारी
भ्रष्टाचारी
author img

By

Published : Jun 7, 2022, 1:49 PM IST

मुंबई - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रसिद्ध केलेल्या गेल्या सहा महिन्यातील लाचखोरीच्या अहवालानुसार राज्यातील महसूल खाते सर्वाधिक लाचखोर असल्याचे दिसून येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालानुसार 1 जानेवारी ते 5 जून या काळात एकूण 313 प्रकरणांपैकी 73 प्रकरणे ही एकट्या महसूल विभागाशी निगडीत आहेत.

कोणते अधिकारी लाचखोर..? - महसूल विभागातील 73 प्रकरणांपैकी श्रेणी 1 व श्रेणी-2 मधील सहा अधिकारी तर तृतीय श्रेणीतील 63 अधिकारी लाचखोर असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

पोलीस विभागाचा दुसरा क्रमांक - महसूल विभागा पाठोपाठ पोलीस खात्याचा लाचखोरीत दुसरा क्रमांक लागला आहे. या खात्यातील 69 प्रकरणे दाखल झाली असून यात श्रेणी 1 मधील चार अधिकारी दुसऱ्या श्रेणीतील 12 तर तृतीय श्रेणीतील 65 अधिकार्‍यांचा समावेश आहे.

एकूण 44 खात्यांमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणे नोंदवण्यात आली असून यामध्ये मुंबई महानगरपालिका अधिकारी रंगेहात पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने जिल्हा परिषदेतील 25 अधिकारी, पंचायत समिती मधील 20 अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले असून वन विभागातील सात अधिकाऱ्यांना सापळ्यात पकडण्यात आले. शिक्षण खात्यातील 15 आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील आठ लाचखोर अधिकाऱ्यांनाही पकडण्यात आले. हे सर्व अधिकारी श्रेणी एक, दोन व तीन पदावर कार्यरत होते.

कोट्यवधींची रक्कम जप्त ? - 306 लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात सापळा लावून करण्यात आलेल्या कारवाईत 14 कोटी 3 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर मुंबईतील सुरेश बामणे नावाच्या एका पोलीस शिपायाकडे आणि त्याच्या पत्नीकडे 12 कोटी 70 लाख रुपयांची बेहिशोबी संपत्ती आढळली. त्याच्या एकूण उत्पन्नाच्या स्रोतावर पेक्षा ही संपत्ती 15 टक्‍क्‍यांनी अधिक आहे.

पालिका अधिकारीही लक्षाधीश - मुंबई महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागातील अधिकारी नितीन पाटणकरही बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हेगार ठरले असून त्यांच्याकडे 38 लाख 38 हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली ही मालमत्ता त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा 45 टक्‍क्‍यांनी अधिक आहे. ना म जोशी मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक भारत मुंडे यांना सात लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. बलात्काराच्या गुन्ह्यातील एका आरोपीचे नाव वगळण्याच्या बदल्यात ही लाच मागण्यात आली होती. रेल्वेने एका शेतकऱ्याकडून संपादित केलेल्या जमिनी प्रकरणी भिवंडीचे तहसीलदार विठ्ठल गोसावी, विजय भोइर, सराफ लक्ष्मणसिंग राजपूत यांना सहा लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमा त्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी आगाऊ घेण्यात आलेले 43 धनादेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जमा केले असून सुमारे दोन कोटी 30 लाख रुपये यानुसार जप्त करण्यात आले आहेत.

माजी आमदारावरही बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा - मीरा-भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या पत्नी विरोधात आठ कोटी 25 लाख रुपयांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांकडून दलालांची नियुक्ती - स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांकडून दलालांची नियुक्ती करण्यात येते आणि दलालांमार्फत लाच घेतली जाते असे अनेक प्रकरणात समोर आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता अतिशय सक्षम रित्या काम सुरू केले असून पारदर्शकपणे प्रकरणे हाताळली जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी समोर येऊन संपर्क साधावा असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

हेही वाचा - Sanctuaries with Reserved Area : राज्यात नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रासह, ३ अभयारण्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.