ETV Bharat / city

Rescue Teams For Flood :  पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बचाव पथके; स्थलांतरितांसाठी व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

राज्यातील भाजप पुरस्कृत शिंदे सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. राज्यात पेट्रोल व डिझेलचे दर कमी करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीतील पूरपरिस्थिती हाताळण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पूरग्रस्तांसाठी बचाव पथके ( Rescue Teams Send For Flood Victims ), स्थलांतरित नागरिकांची पुरेशी व्यवस्था ( Mandates for Adequate Arrangements of Migrants ) पुरेशी व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.

CM and Deputy CM talking to the media
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माध्यमाशी बोलताना
author img

By

Published : Jul 14, 2022, 5:32 PM IST

मुंबई : राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश भाग पाण्याखाली गेल्याने ( Most Parts of Gadchiroli are Under Water ) येथील पूरग्रस्तांसाठी बचाव पथके ( Rescue Teams Send For Flood Victims ) पाठवावीत, असे सक्त निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी दिले. स्थलांतरित नागरिकांची यावेळी पुरेशी व्यवस्था करा, असे आदेश राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आले आहेत. ( Mandates for Adequate Arrangements of Migrants )

शहरासह जिल्ह्याचा बराचसा भाग पाण्याखाली : गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील शहरी भाग पाण्याखाली गेला आहे. मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. अशातच तेलंगणा सरकारने सिरोंचा येथे मेडीगट्टा बॅरिकेड्सचे सगळे उघडलेले 85 दरवाजे उघडले आहेत. ( 85 gates of Medigatta Barricades at Sironcha )त्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. या नागरिकांना तत्काळ सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके त्याठिकाणी पाठवावी तसेच प्रसंगी बाजूच्या राज्यातूनही एनडीआरएफ पथक मागवावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

तेलंगणा सरकारलासुद्धा सहकार्याचे आवाहन : तेलंगणामधील श्रीपाद एलमपल्ली प्रकल्पाचे दरवाजे कमी न करण्याबाबत तेलंगणा सरकारला विनंती करावी तसेच गोसीखुर्द विसर्गाचे योग्य नियोजन करावे. नागरिकांचे योग्य पद्धतीने स्थलांतर व्हावे तसेच त्यांना जेवण, पिण्याचे चांगले पाणी मिळावे तसेच त्यांच्यावर आवश्यकतेनुसार व्यवस्थित उपचार व्हावेत, असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला तसेच मदत पुनर्वसन विभागाला दिले आहेत.

हेही वाचा : CM Shinde After Cabinet Meeting: आता पुन्हा नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार!

हेही वाचा : Shinde Government: महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांना शिंदे सरकारकडून ब्रेक!

हेही वाचा : Vikhe Patil Sharply Criticized Sharad Pawar : शरद पवार यांनी आत्मपरीक्षण करावं : आमदार राधाकृष्ण विखे पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.