ETV Bharat / city

काविळसाठी तयार केले औषध, कोरोनावर ठरले गुणकारी, वाचा "रेमडेसिवीर" विषयी सबकुछ - रेमडेसिवीर इंजेक्शन

2014 मध्ये हे औषध इबोलावर गुणकारी असल्याचे दिसून आले. तर कोरोनाच्या उद्रेकातही हेच औषध प्रभावी ठरले. त्यामुळे आता कोरोनावर उपचारासाठी रेमडेसिवीरचा वापर केला जात आहे.

कावीळवरील उपचारासाठी बनविलेले रेमडेसिवीर कोरोनावर ठरत आहे गुणकारी, जाणून घ्या महत्वाची तथ्ये...

author img

By

Published : Apr 9, 2021, 1:02 PM IST

Updated : Apr 9, 2021, 1:15 PM IST

मुंबई : राज्यातील कोरोनाचा उद्रेक वाढत असताना यावरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शच्या तुटवड्याच्याही बातम्या समोर येत आहेत. रेमडेसिवीर कोरोनावर उपचारांसाठी वापरले जात असले तरी याची मूळ निर्मिती ही कावीळवर उपचारांसाठी करण्यात आली होती. मात्र 2014 मध्ये हे औषध इबोलावर गुणकारी असल्याचे दिसून आले. तर कोरोनाच्या उद्रेकातही हेच औषध प्रभावी ठरले. त्यामुळे आता कोरोनावर उपचारासाठी रेमडेसिवीरचा वापर केला जात आहे. जाणून घेऊया रेमडेसिवीरविषयी काही महत्वाची तथ्ये..

रेमडेसिवीर होते फक्त संशोधनात्मक औषध

रेमडेसिवीरला एफडीएची मान्यता मिळण्यापूर्वी हे संशोधनात्मक औषध म्हणून गणले जात होते. एखाद्या विशिष्ट आजारावरील औषध म्हणून ते वापरण्यात आलेले नव्हते. मात्र काही आजारांवरील संभाव्य उपचारपद्धतीसाठी याचा अभ्यास करण्यात आला होता.

कावीळवर उपचारासाठी रेमडेसिवीरची निर्मिती

मुख्यत्वे कावीळावरील संभाव्य उपचारासाठी रेमडेसिवीरची निर्मिती करण्यात आली होती. 2014 मध्ये इबोला साथीच्या उद्रेकादरम्यान यावरील संभाव्य उपचारापद्धतीसाठी याचा अभ्यास करण्यात आला. यात हे औषध चांगलेच प्रभावी दिसून आले. सार्स आणि मर्स अशा श्वसनाशी संबंधित आजारांसाठी कारणीभूत असणाऱ्या विषाणूंवर हे औषध प्रभावी असल्याचे काही अभ्यासांतून समोर आलेले आहे. कोरोनावरील उपाचारांतही रेमडेसिवीर प्रभावी असल्याचे दिसून आले.

रेमडेसिवीर कोरोनाविरोधात कसे काम करते

कोरोनाच्या विषाणूला त्याची प्रतिकृती तयार करण्यास प्रतिबंध करण्याचे महत्वाचे काम रेमडेसिवीर करते. यामुळे रुग्णाच्या शरीरात कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा बसतो. कोरोना विषाणूला प्रतिकृती तयार करण्यासाठी लागणारे एन्झाईम रेमडेसिवीरमुळे तयार करता येत नाही. कोरोनाची तीव्रता अधिक असणाऱ्या रुग्णास रेमडेसिवीर दिल्यास त्याच्यात सुधारणा दिसून येत असल्याचे समोर आले आहे.

अमेरिकेच्या एफडीएने दिली होती मंजूरी

अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने ऑक्टोबरमध्ये कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी रेमडेसिवीरच्या वापरास मान्यता दिली होती. कोरोनावरील उपचारासाठी वापराची एफडीए मान्यता मिळालेले हे पहिले औषध ठरले होते. तत्पूर्वी मे महिन्यात रेमडेसिवीरच्या आपत्कालीन वापरास एफडीएने मान्यता दिली होती. रेमडेसिवीर कोरोनावरील उपचारांत प्रभावी ठरत असल्याचे एका अभ्यासातून समोर आल्यानंतर याच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली होती.

अमेरिकेतील जिलिएड सायन्स मुख्य उत्पादक

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील जिलिएड सायन्सेस या कंपनीकडून रेमडेसिवीरचे उत्पादन केले जाते. कोरोनाविरोधातील लढ्यात जगातील सुमारे 50 देशांनी रेमडेसिवीरच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिलेली आहे.

भारतात चार कंपन्यांचे रेमडेसिवीर उपलब्ध

भारतात झायडस कॅडिला, हेटेरो लॅब्स, डॉ. रेड्डी आणि सिपला या कंपन्यांना रेमडेसिवीरच्या उत्पादनास मंजुरी मिळालेली आहे. यापैकी झायडस कॅडिलाचे रेमडेसिवीर इंजेक्शन रेमडॅक या नावाने, हेटेरो लॅब्सचे कोविफोर या नावाने, डॉ. रेड्डीचे रेडीक्स या नावाने तर सिपलाचे सिप्रेमी या नावाने उपलब्ध आहे.

रेमडेसिवीरचे साईड इफेक्ट

मळमळ, रक्तदाब कमी होणे, घाम येणे असे काही साईड इफेक्ट रेमडेसिवीरचे दिसून येतात.

हेही वाचा - लसींचा तुटवडा : 30 लसीकरण केंद्र बंद, आज ही केंद्र बंद पडणार!

Last Updated : Apr 9, 2021, 1:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.