मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट बणवण्यात आला आला आहे. हा चित्रपट निवडणुकीच्या काळात प्रदर्शित न करता निवडणुकीनंतर प्रदर्शित करावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात सतीश गायकवाड यांनी दाखल केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नरेश पाटील व न्यायाधीश नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर याचिकादाखल झाली आहे. निवडणुकीदरम्यान चित्रपटाचा फायदा राजकीय पक्षांना होऊ शकतो, त्यामुळे हा चित्रपट निवडणुकीदरम्यान प्रदर्शित न करता निवडणुकीनंतर प्रदर्शित करावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित कथा दाखविण्यात आली आहे. या चित्रपटात नरेंद्र मोदींची भूमिका अभिनेता विवेक ओबेरॉय याने साकारली आहे. १ एप्रिल रोजी या याचिकेवर तातडीची सुनावणी होणार आहे.