ETV Bharat / city

मालेगाव स्फोट : साध्वी प्रज्ञासिंहसह सर्व आरोपींना 19 डिसेंबरला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश - मालेगाव बॉम्बस्फोट आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित न्यूज

2008 मालेगाव बॉम्बस्फोटासंदर्भात गेल्या 12 वर्षांपासून विशेष न्यायालयामध्ये खटला प्रलंबित असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर या संदर्भात 3 डिसेंबार 2020 पासून नियमित सुनावणी सुरू होत आहे. या नियमित सुनावणीसाठी या प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर दिवेदी, अजय राहीलकर व संदीप डांगे यांना अटक करण्यात आली होती.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी नियमित सुनावणी न्यूज

author img

By

Published : Dec 3, 2020, 12:15 PM IST

Updated : Dec 3, 2020, 2:15 PM IST

मुंबई - 2008 मालेगाव बॉम्बस्फोटासंदर्भात गेल्या 12 वर्षांपासून विशेष न्यायालयामध्ये खटला प्रलंबित असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर या संदर्भात 3 डिसेंबार 2020 पासून नियमित सुनावणी सुरू होत आहे. या नियमित सुनावणीसाठी या प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर दिवेदी, अजय राहीलकर व संदीप डांगे यांना अटक करण्यात आली होती. 3 डिसेंबरला सुनावणीवेळी गैरहजर राहिल्याने विशेष एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींना आता 19 डिसेंबरला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले आहेत.

475 साक्षीदार पैकी तीनशे साक्षीदारांची साक्ष अजूनही बाकी

या प्रकरणातील आणखी एक आरोपी समीर कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून या खटल्याला होत असलेल्या विलंबाबद्दल उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, म्हणून मागणी केली होती. त्यानुसार विशेष न्यायालयाने या संदर्भात नियमित सुनावणी डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. एनआयए न्यायालयात गेल्या 6 महिन्यात केवळ 14 जणांची साक्ष नोंदवण्यात आली असून या प्रकरणी 475 साक्षीदार आहेत. अजूनही 300 साक्षीदारांची साक्ष नोंदवणे बाकी असल्यामुळे या संदर्भात न्यायालयाकडून नियमित सुनावणी सुरू होत असून या प्रकरणातील सर्व आरोपींना सुनावणीच्या वेळेस न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

हेही वाचा - भिवंडीत कत्तलीसाठी गायी नेणारे वाहन पकडले; 5 जणांविरुद्द गुन्हा दाखल

सर्व साक्षीदार तपासणे हे किचकट काम

न्यायाधीश पी. आर. सितरे यांनी गुरुवारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. दररोजच्या सुनावणीच्या अर्जावर विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ यांनी सांगितले की, ते सुनावणी लवकर पूर्ण करण्यास तयार आहेत. परंतु, त्यांना साक्षीदार शोधावे लागतील, जे अत्यंत अवघड काम आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये न्यायालयाने दहशतवादाच्या प्रकरणातील लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, प्रज्ञासिंह ठाकूर आणि अन्य पाच आरोपींविरोधात आरोप निश्चित केले होते.

सुनावणी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

एनआयएने म्हटले आहे की, आरोप निश्चित झाल्यानंतर या प्रकरणातील खटला त्वरेने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वी सुनावणी घेत असलेल्या न्यायाधीशांच्या निवृत्तीनंतर आणि कोविड-19 च्या साथीमुळे सुनावणी लांबणीवर पडली आहे, असेही तपास यंत्रणेने न्यायालयाला सांगितले. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथे मशिदीजवळ पार्क केलेल्या मोटारसायकलमध्ये लावलेल्या स्फोटकांचा स्फोट होऊन सहा जण ठार तर, 100 हून अधिक लोक जखमी झाले.

हेही वाचा - खुशखबर.. पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना काळ्या बिबट्याचे पुन्हा दर्शन

Last Updated : Dec 3, 2020, 2:15 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.