मुंबई - उधारीचे पैसे मागितल्याने नराधमाने पीडित तरुणावर अनैसर्गिक अत्याचार करुन गुप्तांगावर मेणबत्तीचे चटके दिल्याने खळबळ उडाली. इतकेच नाहीतर तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पाईप घातल्याचा किळसवाना प्रकार केल्याचाही प्रकार घडल्याचा दावा तरुणाने केला. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात सुरेश म्हस्के या आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गोडाऊनमध्ये केले अनैसर्गिक अत्याचार - पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराने संशयीत आरोपी सुरेश म्हस्केला काही पैसे उधारीवर दिले होते. हे पैसे देण्यास आरोपी टाळाटाळ करत होता. त्यामुळे तक्रारदाराने पैशासाठी तगादा लावल्याने राग सुरेशला अनावर झाला. त्यातूनच सुरेशने 6 जुलैच्या दुपारी 2 वा पीडित तरुणाला मुलुंड कॉलनी परिसरातील गोडाऊनमध्ये गाठून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. एवढ्यावरच न थांबता सुरेशने तक्रारदाराच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पाईप घालून मेणबत्तीने चटके देत क्रूर कृत्य केल्याचा दावाही पीडित तरुणाने केला आहे.
पीडित तरुणावर सायनच्या रुग्णालयात सुरू आहेत उपचार - या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तक्रारदारावर सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी सुरेशवर 377, 326, 504, 506 भादंवी कलमांतर्गत मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसानी फरार सुरेशचा शोध सुरु केला आहे.