ETV Bharat / city

दिलासा...राज्यातील रिकव्हरी रेट 50 टक्क्यांहून अधिक; आरोग्यमंत्री - maharashtra corona news

राज्यात एकाच महिन्यात दहा दिवसांच्या अंतराने एकाच दिवशी ४ हजार १६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. संबंधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

mumbai corona news
राज्यात एकाच महिन्यात दहा दिवसांच्या अंतराने एकाच दिवशी ४ हजार १६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
author img

By

Published : Jun 24, 2020, 7:53 PM IST

मुंबई - राज्यात एकाच महिन्यात दहा दिवसांच्या अंतराने एकाच दिवशी ४ हजार १६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. संबंधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

राज्यात आतापर्यंत ७३ हजार ७९२ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यांत आज ३ हजार ५३० रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यात मुंबई मंडळात आतापर्यंत ५० हजारांहून अधिक रुग्ण बरे झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

२९ मे रोजी राज्यात एकाच दिवशी ८ हजार ३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत असून सुमारे १५ जूनला ५ हजार ७१ एवढे रुग्ण बरे होऊन एकाच घरी सोडण्यात आले. त्यानंतर आज पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची विक्रमी संख्या समोर आलीय. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ५१ टक्के असून सध्या अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचा कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्क्यांवर कायम असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या ४ हजार १६१ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात ३ हजार ५३० (आतापर्यंत एकूण ५१ हजार ७३७) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ३५५ (आतापर्यंत एकूण ११ हजार २९९), नाशिक मंडळात १३९ (आतापर्यंत एकूण ३६५२), औरंगाबाद मंडळ २१ (आतापर्यंत एकूण २५६२), कोल्हापूर मंडळ २४ (आतापर्यंत एकूण १३८३), लातूर मंडळ ७ (आतापर्यंत एकूण ५३२), अकोला मंडळ २६ (आतापर्यंत एकूण १४४८), नागपूर मंडळ ५९ (आतापर्यंत एकूण ११७९) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.