मुंबई - 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) सुनावणी होण्याची शक्यता आहे. यावर बंडखोर शिंदे गटाच्या आमदारांकडून विजय आमचाच होईल. न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागेल असा विश्वास व्यक्त केला जात असताना, शिवसेनेच्या आमदारांकडून ( Shiv Sena MLA ) देखील निकाल लोकशाहीच अस्तित्व ठरवेल, अशा प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. यावर आता शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.
हे लादलेलं सरकार - यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे हे सरकार स्थापनेचा प्रयत्न झालेला आहे. हे लादलेले सरकार आहे. त्यासाठी राजभवनाचा वापर केला. विधिमंडळाचा वापर केला. या सगळ्या विरोधात शिवसेना महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेच्या वतीने आता सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. आम्हाला विश्वास आहे. या राज्यात लोकशाही आहे की नाही, या राज्याचा राज्य कारभार घटनेनुसार चालतोय की नाही याचा फैसला आज होणार आहे.
सर्वोच्च न्यायालय कुणाच्या खिशात - संजय राऊत म्हणाले की, "संपूर्ण देश सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे एका अपेक्षाने पाहत आहे. सर्वोच्च न्यायालय नेमकं काय निर्णय देईल. त्यावर लोकशाहीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. पण, समोरची लोक सर्वोच्च न्यायालय देखील आमचे खिशातच आहे, अशा अविर्भावात जी काही वक्तव्य करत आहेत. त्यावरून इथल्या जनतेच्या मनात शंका निर्माण होते. सर्वोच्च न्यायालय कोणाच्याही खिशात असू शकत नाही. याची न्यायव्यवस्था कोणाची बटीक असू शकत नाही. अशी आमची भावना आहे. म्हणून, आम्ही या सर्वोच्च न्यायालयाचे निकालाकडे एका आशेने पाहत आहे." अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
दरम्यान, दोन्ही बाजूंनी निकाल आमच्याच पक्षात लागेल, अशा प्रतिक्रिया समोर येत असतानाच आता न्यायालय नेमकं काय निर्णय घेते? याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण याच निकालावर महाराष्ट्राच्या राजकारणाच पुढच चित्र काय असेल हे ठरणार आहे. आणि, याच निकालावर शिवसेना कुणाची ? धनुष्यबाण कुणाचा या नव्या विषयाला सुरुवात होणार आहे.
हेही वाचा - Maharashtra Political Crisis : याचिकांवरील सुनावणीसाठी स्वतंत्र घटनापीठ; बंडखोरांवर तुर्त कारवाई नाही