ETV Bharat / city

खरी लढाई आता विधानसभेत, भाजपा नेते रस्त्यांवर फिरु शकणार नाही; नवाब मलिकांचा इशारा

author img

By

Published : Oct 29, 2021, 10:46 AM IST

Updated : Oct 29, 2021, 12:10 PM IST

आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर आज त्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्दे मांडले. त्यावेळी बोलताना त्यांनी समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्र, काशीब खान आणि एनसीबीला दिलेले पत्र, यासह विविध मुद्यांवर प्रतिक्रिया दिली.

nawab malik
nawab malik

मुंबई - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या कार्यपद्धतीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. याच दरम्यान त्यांनी अनेक गौप्यस्फोटही केले. काल आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर आज त्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्दे मांडले. त्यावेळी बोलताना त्यांनी समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्र, काशीब खान आणि एनसीबीला दिलेले पत्र, यासह विविध मुद्यांवर प्रतिक्रिया दिली. तसेच यावेळी त्यांनी खरी लढाई आता विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात होणार असून त्यावेळी पुन्हा गौप्यस्फोट करेल, त्यावेळी भाजपा नेते रस्त्यावर फिरु शकणार नाही, असा इशाराही त्यांनी भाजपाच्या नेत्यांना दिला.

काय म्हणाले नवाब मलिक -

काल आर्यन खान याला जामीन मिळाला आहे. खरं तर एनसीबीने आर्यनवर ज्या प्रकारे आरोप लावले त्यावरून त्याला किला कोर्टातूनच जामीन मिळालायला हवा होता. मात्र, एनसीबीने जामीन रोखण्याचा प्रयत्न केला. गुन्हा सिद्ध होईपर्यंत जेलमध्ये ठेवणं चुकीचं आणि अन्यायकारक आहे.

दरम्यान, या प्रकरणात नवाब मलिक यांनी या प्रकरणात माझ्या कुटुंबियाला गोवल्याचा आरोप केला होता. यावरही नवाब मलिक यांनी पुन्हा स्पष्टीकरण दिले. 'कुटूंबियांना गोवलं हा वानखेडेचा आरोप चुकीचा आहे. माझी लढाई कुटूंबाविरोधात किंवा धर्माविरोधात नाही तर अन्यायाविरोधात आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

नवाब मलिक यांना एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने पत्र पाठवले होते. त्यावर कोणतेही नाव नव्हते. ते पत्र मी एनसीबीला दिले आहे. या पत्रात 26 प्रकरणांची नावे आहेत. यात खारघर येथील नायझेरीन प्रकरणाचीही उल्लेख आहे. याच प्रकरणातील एका पंचाने खुलासा करत ही त्याच्याची कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या, असे सांगितले आहे. त्यामुळे याची चौकशी व्हावी, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

nawab malik
नवाब मलिकांचे सीव्हीसीला पत्र

'संजय राऊत आणि माझी जोडी सलीम-जावेद सारखी' -

'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त' म्हणून एनसीबीच्या कारवाईबाबत आपण अजूनही नवीन-नवीन खुलासे करणार आहोत. तसेच आता केवळ इटरवल झालेला आहे. हा संपूर्ण चित्रपट आता क्लायमॅक्सच्या दिशेने जातो आहे. या चित्रपटात इंटरवलनंतर आपण धमाका करणार आहोत, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. 'आम्ही दोघेही प्रसिद्ध लेखक समीर जावेद प्रमाणे असून इंटरवलच्या आधी ते आणि नंतर मी, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

हेही वाचा - एनसीबीचे मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र; पंच प्रभाकर साईलच्या चौकशीसाठी मागितली मदत

Last Updated : Oct 29, 2021, 12:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.