औरंगाबाद - प्रहार संघटनेने औरंगाबादच्या गारखेडा परिसरात आंदोलनाला सुरुवात केली. दुपारी बारा वाजेपासून प्रहारचे कार्यकर्ते पाण्याच्या टाकीवर चढले असून दानवे यांनी माफी मागावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेतर्फे केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात रोष व्यक्त केला. औरंगाबादेत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारत गारखेडा परिसरात पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलनाला सुरुवात केली. दानवे विरोधी घोषणाबाजी करत पाण्याच्या टाकीवरच जाळपोळ कार्यकर्त्यांनी केली. रावसाहेब दानवे यांनी प्रसार माध्यमांसमोर जाहीर माफी मागावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. मागण्या मान्य होईपर्यंत पाण्याच्या टाकीवरून उतरणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे