मुंबई - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य ग्राहकांना तीन महिन्यांपर्यंत कर्जाचा ईएमआई न भरण्याची मुभा दिल्याची घोषणा केली होती. या घोषणेमुळे सर्वसामान्य कर्जधारकास काहीसा दिलासा मिळाला. एकीकडे काही सरकारी बँकांनी दिलेल्या गाईडलाईनचे पालन करायला सुरुवात ही केली. परंतु अनिश्चिततेच्या या परिस्थितीमध्ये काही खासगी बँका मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गाईड लाईनचे पालन करताना दिसत नाही आहेत.
ईएमआय वसूल करू नये, असे RBI ने आवाहन करून सुद्धा काही खासगी क्षेत्रातील बँक आपल्या ग्राहकांना एमआई न भरल्यास अतिरिक्त शुल्क आकारणी करण्यात येईल असे सांगत आहेत. त्यासंदर्भात खाजगी क्षेत्रातील बँकांचा मनमानी कारभाराचे दर्शन घडवणारा एका कर्ज ग्राहकाचा व्हिडिओ मुंबईत समोर आला. कर्ज धारकाने दिलेल्या माहितीनुसार कर्जधारकाने वाहन कर्ज एका खासगी बँकेतून घेतले होते. आरबीआयच्या मोरीटोरिअम सेवे प्रमाणे ग्राहकांना 3 महिने कर्जपरत फेडीची मुभा असताना या कर्जधारकाला ईएमआई न भरल्यास कर्जावर अतिरिक्त शुल्क आकारणीचे सांगण्यात आले. ही तर झाली खासगी बँकांच्या करवसुलीची तऱ्हा.
दुसरीकडे क्रेडिट कार्ड कंपन्या लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना हिडन चार्जेस लावून त्यांच्या घरगुती बजेटवर ताण आणत आहेत. क्रेडिट कार्ड कंपन्याची कस्टमर केअर सेवा लॉकडाऊनमुळे बंद असल्याने कोणाकडे आपल्या तक्रारी मांडव्या हा सुद्धा यक्ष प्रश्न ग्राहकासमोर आहे.