ETV Bharat / city

रविकांत तुपकरांचा रयत क्रांती सेनेत प्रवेश; सदाभाऊंनी केले स्वागत - assembly election 2019

यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी तुपकर यांचे स्वागत केले आहे. तसेच रणजीत बागल आणि पुजाताई झोळ यांनीही रयतक्रांतीत प्रवेश केला आहे.

रविकांत तुपकर
author img

By

Published : Sep 28, 2019, 1:57 PM IST

Updated : Sep 28, 2019, 4:11 PM IST

मुंबई - स्वाभिमान शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत शेतकरी संघटनेशी घरोबा केला आहे. स्वाभिमानीचे कार्यकर्ते रणजीत बागल, पुजाताई झोळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रयत क्रांतीमध्ये प्रवेश केला.

रविकांत तुपकरांचा रयत क्रांती सेनेत प्रवेश

यावेळी तुपकर म्हणाले, मला सदाभाऊंची रोज आठवण येत होती. सदाभाऊंनी प्रेम केले. मला लाल दिवा दिला. भाजप- शिवसेनेत प्रवेशाचा पर्याय होता. मात्र, शेतकरी चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी स्वच्छेने लोकांना घेऊन रयतमधे प्रवेश केला. शेतकरी चळवळीचा परीघ बदलला आहे. निव्वळ स्टंट करुन प्रश्न सुटत नाहीत. स्वाभिमानी सोडताना वेदना झाल्या. राजू शेट्टी यांच्याबद्दल मनात सदैव आदर राहील, असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा - आपल्यामुळे शरद पवारांना या वयात त्रास होऊ नये म्हणून राजीनामा - अजित पवार

यावेळी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, सत्तेत गेल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार? देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री आहेत. त्यांनी 5 वर्षात एकदाही शेतकऱ्यावर गोळी घातली नाही. सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेईल, तेव्हा सदाभाऊ पहीला सत्तेत बाहेर पडेल, असे त्यांनी सांगितले.

शेट्टी आणि खोत यांच्या वादात तुपकर हे शेट्टी यांच्या बाजूने राहिले. खोत यांची संघटनेतून हकालपट्टी करण्यात तुपकर यांची महत्त्वाची भूमिका होती. तेच तुपकर आता खोत यांच्याशी सहकार्य करण्याच्या तयारीत आहेत. खोत यांच्या संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईतील गरवारे क्लब येथे पार पडली. तुपकर यांनी याच बैठकीत संघटनेतील इतर नेत्यासह प्रवेश केला.

तुपकर हे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली किंवा बुलढाणा या विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. शिवसेना आणि भाजपच्या जागावाटपात चिखलीची जागा भाजपकडे जाऊ शकते. बुलढाण्याच्या जागेवर शिवसेना हक्क बजावू शकते. शिवसेनेचा हा दावा खोडण्यासाठी बुलढाण्याची जागा युतीच्या मित्रपक्षासाठी म्हणजे रयत शेतकरी संघटनेला सोडण्याची रणनीती आहे. मग शेतकरी संघटनेचे उमेदवार म्हणून तुपकर यांना संधी मिळू शकते, असे या मागचे गणित आहे.

हेही वाचा - भाजपचा गेल्या ५ वर्षापासून अजित पवारांना संपवण्याचा प्रयत्न - जितेंद्र आव्हाड

ही जागा रयत शेतकरी संघटनेसाठी म्हणून देण्यात येणार असली तरी मित्रपक्षांच्या उमेदवारांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा भाजपचा आग्रह आहे. त्यामुळे तुपकर हे भाजपचे उमेदवार म्हणूनच रिंगणात उतरतील, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

शेट्टी आणि खोत यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार टीकाटिप्पणी सुरू झाली होती. खोत यांना सत्तासुंदरीचा मोह झाल्याची टीका तेव्हा झाली होती. ही टीका करणाऱ्या तुपकर यांच्याकडे तेव्हा वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद होते. शेट्टी यांनी सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर तुपकर हे सत्तेचे तूप सोडणार का? असा सवाल खोत यांच्या गटातून केला गेला होता. तुपकर यांनीही मला सत्तासुंदरीचा मोह नसल्याचे सांगत पदाचा राजीनामा दिला होता. आता त्याच खोत यांनी तुपकर यांना पुन्हा सत्तासुंदरीच्या वर्तुळात आणले आहे.

हेही वाचा - देशातील सर्वात मोठा ड्रॉय डॉक संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नौदलाला समर्पित

Intro:Body:

[9/28, 1:23 PM] Vijay Gayakawad1: मुंबई : अलर्ट

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर  यांचा रयत  क्रांती  संघटनेत प्रवेश

[9/28, 1:28 PM] Vijay Gayakawad1: कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत  यांनी केले स्वागत

[9/28, 1:39 PM] Vijay Gayakawad1: रणजीत बागल आणि पुजाताई झोळ यांचाही  रयतक्रांतीत प्रवेश

Conclusion:
Last Updated : Sep 28, 2019, 4:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.