ETV Bharat / city

...तर फेरीवाला आणि नागरिकांमध्ये संघर्ष होईल ! - मुंबईतील फेरीवाला

केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणाची पालिका प्रशासनाकडून मनमानी पद्धतीने अंमलबजावणी केली जात असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा आहे. यामुळे या धोरणाची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी फेरीवाल्यांचे, ते व्यवसाय करत असलेल्या ठिकाणीच पुनर्वसन करावे, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्थायी समितीत केली.

मुंबई महानगरपालिका विरोधी पक्ष नेते रवी राजा
रवी राजा
author img

By

Published : Feb 8, 2020, 3:24 AM IST

मुंबई - केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणाची पालिका प्रशासनाकडून मनमानी पद्धतीने अंमलबजावणी केली जात असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा आहे. यामुळे या धोरणाची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी फेरीवाल्यांचे, ते व्यवसाय करत असलेल्या ठिकाणीच पुनर्वसन करावे, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्थायी समितीत केली. पालिकेने मनमानी पद्धतीने फेरीवाल्यांचे पुनर्वसन केल्यास नागरिक आणि फेरीवाल्यांमध्ये संघर्ष निर्माण होईल, अशी भीती नगरसेवकांनी व्यक्त केली. यावर फेरीवाला धोरणासंदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण करण्याचे आदेश स्थयी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत.

मुंबई महानगरपालिका विरोधी पक्ष नेते रवी राजा यांची प्रतिक्रिया

हेही वाचा... गायरान जमीन मिळविण्यासाठी शहीद जवानाच्या पत्नीची वर्षभरापासून पायपीट; जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष

केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबईत २०१४ मध्ये सर्व्हे करण्यात आला. त्यामधील अधिकृत फेरवाल्यांना लवकरच जागा वाटप केले जाणार आहे. त्यासाठी पालिकेने कोणत्या रस्त्यावर फेरीवाल्यांनी बसावे, हे निश्चित केले आहे. सध्या फेरीवाले ज्या ठिकाणी आपला धंदा करत आहेत, त्या जागेवरून त्यांचे इतर ठिकाणी पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठी पालिकेने शहरात अनेक ठिकाणी मार्किंग केले आहे. ज्या ठिकाणी फेरीवाले नव्हते त्या ठिकाणी फेरीवाले आता बसणार असल्याने त्याविभागातील नागरिकांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. असे झाल्यास फेरीवाला आणि स्थानिक नागरिकांमध्ये संघर्ष होणार असल्याचे सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे स्थायी समितीच्या निदर्शनास आणले.

हेही वाचा... पाणीपुरीचा ठेला ते रेस्टॉरंट... वाचा बांद्रातील 'एल्को रेस्टॉरंट'ची यशोगाथा

नविन हॉकींग झोन बनवु नका - रवि राजा

'फेरीवाला धोरणात, जे फेरीवाले अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी बसत असल्यास त्यांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे अशी नोंद आहे. याच कायद्यात संबंधित व्यक्तींना टाऊन वेन्डिंग कमिटीमध्ये घ्यावे, असे स्पष्ट नमूद केले आहे. त्यानंतरही स्थानिक नगरसेवकांना टाऊन वेन्डिंग कमिटीमध्ये नगरसेवकांचा समावेश केला जात नाही. यामुळे पालिकेचे विशेष सभागृह बोलावून टाऊन वेन्डिंग कमिटीमध्ये नगरसेवकांचा समावेश करावा याबाबतचा ठराव मंजूर करावा', अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनीही, नगरसेवकांना डावलून फेरीवाला धोरण राबवू नये, अशी मागणी केली. भाजपाच्या नगरसेविका राजश्री शिरवडकर यांनी नगरसेवकांना व रहिवाशांना विचारात न घेता फेरिवाल्यांचे पुनर्वसन केल्यास रहिवाशी व फेरीवाले संघर्ष होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली. यावर फेरीवाला धोरणासंदर्भात नगरसेवकांनी केलेल्या सूचनांची प्रशासनाने दखल घ्यावी तसेच करण्यात आलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण करण्याचे आदेश, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.

Intro:मुंबई - केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणाची पालिका प्रशासनाकडून मनमानी पद्धतीने अंमलबजावणी केली जात असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा आहे. यामुळे या धोरणाची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी फेरीवाल्यांचे ते धंदा करत असलेल्या ठिकाणीच पुनर्वसन करावे अशी मागणी सर्व पक्षीय नगरसेवकांनी स्थायी समितीत केली. पालिकेने मनमानी पद्धतीने फेरीवाल्यांचे पुनर्वसन केल्यास नागरिक आणि फेरीवाल्यांमध्ये संघर्ष निर्माण होईल अशी भीती नगरसेवकांनी व्यक्त केली. यावर फेरीवाला धोरणासंदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण करण्याचे आदेश स्थयी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत. Body:केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबईत २०१४ मध्ये सर्व्हे करण्यात आला. त्यामधील अधिकृत फेरवाल्यांना लवकरच जागा वाटप केले जाणार आहे. त्यासाठी पालिकेने कोणत्या रस्त्यावर फेरीवाल्यांनी बसावे हे निश्चित केले आहे. सध्या फेरीवाले ज्या ठिकाणी आपला धंदा करत आहेत त्या जागेवरून त्यांचे इतर ठिकाणी पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठी पालिकेने शहरात अनेक ठिकाणी मार्किंग केले आहे. ज्या ठिकाणी फेरीवाले नव्हते त्या ठिकाणी फेरीवाले आता बसणार असल्याने त्याविभागातील नागरिकांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. असे झाल्यास फेरीवाला आणि स्थानिक नागरिकांमध्ये संघर्ष होणार असल्याचे सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे स्थायी समितीच्या निदर्शनास आणले.

याबाबत बोलताना फेरीवाला धोरणात जे फेरीवाले अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी बसत असल्यास त्यांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे असे नोंद आहे. याच कायद्यात संबंधित व्यक्तींना टाऊन वेन्डिंग कमिटीमध्ये घ्यावे असे स्पष्ट नमूद केले आहे. त्यानंतरही स्थानिक नगरसेवकांना टाऊन वेन्डिंग कमिटीमध्ये नगरसेवकांचा समावेश केला जात नाही. यामुळे पालिकेचे विशेष सभागृह बोलावून टाऊन वेन्डिंग कमिटीमध्ये नगरसेवकांचा समावेश करावा याबाबतचा ठराव मंजूर करावा अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनीही, नगरसेवकांना डावलून फेरीवाला धोरण राबवू नये, अशी मागणी केली. भाजपाच्या नगरसेविका राजश्री शिरवडकर यांनी नगरसेवकांना व रहिवाशांना विचारात न घेता फेरिवाल्यांचे पुनर्वसन केल्यास रहिवाशी व फेरीवाले संघर्ष होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली. यावर फेरीवाला धोरणासंदर्भात नगरसेवकांनी केलेल्या सूचनांची प्रशासनाने दखल घ्यावी तसेच करण्यात आलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण करण्याचे आदेश स्थयी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.

बातमीसाठी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांचा बाईट Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.