ETV Bharat / city

संजय राऊतांचे I AM सॉरी ! इंदिरा गांधींबद्दलचे विधान घेतले मागे

संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इदिरा गांधी यांच्या बद्दल केलेले विधान मागे घेतले आहे. त्यांनी बुधवारी एका खासगी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत इंदिरा गांधींबद्दल विधान केले होते.

Raut withdrew his statement about Indira Gandhi
खासदार संजय राऊत
author img

By

Published : Jan 16, 2020, 2:49 PM IST

Updated : Jan 16, 2020, 3:12 PM IST

मुंबई - माझ्या वक्तव्यामुळे जर कोणी दुखावलं असेल तर मी माझे विधान मागे घेतो असे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी म्हटले. आता काँग्रेस पक्ष आमचा मित्र पक्ष आहे, माझ्या विधानामुळ त्यांना वाईट वाटले, त्यात गैर काय. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींविरोधात कोणी टीका करत होते तेव्हा काँग्रेसचे नेते शांत बसत. मात्र, मी पुढे येऊन त्यांची बाजू घेत होतो, असे राऊत म्हणाले.

खासदार संजय राऊत

काय आहे प्रकरण -

बुधवारी एका मुलाखतीत बोलताना राऊत यांनी इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करिम लाला यांच्यात भेट झाल्याचे म्हटले होते. राऊत यांनी केलेल्या या विधानावरून काँग्रेस नेते आणि राऊत यांच्यात वादाला तोंड फुटले होते. या वरून संजय निरूपम आणि मिलिंद देवरा यांनी संजय राऊत यांनी आपले विधान मागे घेण्याचा सल्ला दिला होता. यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन या बद्दल पस्पष्टीकरण दिले होते. मला इंदिरा गांधी यांच्या बद्दल आदर आहे. जेव्हा जेव्हा इंदिरा गांधींवर टीका झाली तेव्हा त्यांना पाठिंबा देण्याचे काम आम्ही केले आहे. काही लोक विनाकारण वाद निर्माण करत आहेत, असे ते म्हणाले होते. मात्र, त्याच्या वर दबाव वाढल्यानंतर दुपारी संजय राऊत यांनी माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे विधान मागे घेतो, असे म्हणत आपले विधान मागे घेतले.

Intro:मुंबई - माझ्या वक्त्याव्यामुळे जर कोणी दुखावलं असेल तर मी माझे विधान मागे घेतो असे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी म्हटले.
यात काँग्रेसचे आमचे मित्र आहेत, त्यांनी यात पडायला नको होतं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींविरोधात कोणी टीका करत तेव्हा काँग्रेसचे नेते शांत बसत, मात्र मी पुढे येऊन त्यांची बाजू घेत होतो असे राऊत म्हणालेBody:संजय राऊत बाईटConclusion:
Last Updated : Jan 16, 2020, 3:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.