मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या कारला वांद्रे येथे मागून दुचाकीने धडक दिली. तथापि रणवीरला दुखापत झाली नाही आणि तो सुरक्षित आहे. घटनेनंतर अभिनेता रणवीर गाडीचे नुकसान पाहण्यासाठी खाली उतरला आणि काही मिनिटांनंतर तेथून निघून गेला.
फोटोग्राफर विराल भयानी यांनी इंस्टाग्रामवर या घटनेचा व्हिडीओ पोस्ट करीत लिहिलंय, "वांद्रे येथे रणवीर सिंगच्या कारला दुचाकीची धडक बसून एक लहानसा अपघात झाला. नंतर आम्ही त्याला दुसर्या इमारतीत प्रवेश करताना कॅमेऱ्यात कैद केले."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
विराल भयानी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत रणवीर सिंग जेव्हा गाडीतून उतरला तेव्हा रस्त्यावर अनेकांना आश्चर्य वाटल्याचे दिसते. नंतर तो लगेचच गर्दी होऊ नये म्हणून आपल्या गाडीत चुपचाप जाऊन बसला. हौशी फोटोग्राफर्सना त्याने हात केल्याचेही दिसते.