मुंबई - महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा पादचारी पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत मृतांमध्ये तीन परिचारिकांचा समावेश आहे. त्यापैकी रंजना तांबे (४०) या डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या होत्या. घरातील कामे आटोपून त्या रुग्णालयात कामावर जाण्यासाठी निघाल्या, मात्र मध्येच त्यांना मृत्यूने गाठले.
डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या रंजना तांबे या जी. टी. रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होत्या. गुरुवारच्या संध्याकाळी नेहमीप्रमाणे घरातली सर्व कामे आटोपून त्या जी.टी. रुग्णालयात रात्रपाळी निघाल्या. मात्र, मध्येच काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्या छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पुलावरून निघाल्या. त्याचक्षणी त्यांच्या पायाखालचा पूल कोसळला अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले. या दुर्घटनेनंतर ज्या रुग्णालयात त्या कामासाठी जाणार होत्या, त्याच रुग्णालयात त्यांचा मृतदेह नेण्यात आला.
रंजना तांबे या त्यांच्या आईसोबत डोंबिवलीतील गणेश नगरमधील शिवसागर सोसायटीत राहत होत्या. वयोवृद्ध आईला रंजना तांबे या एकमेव आधार होत्या. घरातील कमावत्या रंजना गेल्याने तांबे कुटुंबाचा आधारच हरपला. आणखी एक हृदय पिळवटून टाकणारी बाब म्हणजे, त्या एका पायाने अपंग होत्या. मात्र, त्या मोठ्या उमेदीने जी. टी. रुग्णालयात रुग्णांची सेवा करीत होत्या. या घटनेनंतर त्यांच्या आईला जबर मानसिक धक्का बसला आहे.
Intro:Body:
pramila pawar
CSMT, Collapsed, victims, ranjana tambe, hospital
CSMT Fob Collapsed victims
CSMT Fob Collapse: ज्या रुग्णालयात कामासाठी निघाल्या; तिथे पोहोचला त्यांचा मृतदेह
मुंबई - महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा पादचारी पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत मृतांमध्ये तीन परिचारिकांचा समावेश आहे. त्यापैकी रंजना तांबे (४०) या डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या होत्या. घरातील कामे आटोपून त्या रुग्णालयात कामावर जाण्यासाठी निघाल्या, मात्र मध्येच त्यांना मृत्यूने गाठले.
डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या रंजना तांबे या जी. टी. रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होत्या. गुरुवारच्या संध्याकाळी नेहमीप्रमाणे घरातली सर्व कामे आटोपून त्या जी.टी. रुग्णालयात रात्रपाळी निघाल्या. मात्र, मध्येच काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्या छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पुलावरून निघाल्या. त्याचक्षणी त्यांच्या पायाखालचा पूल कोसळला अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले. या दुर्घटनेनंतर ज्या रुग्णालयात त्या कामासाठी जाणार होत्या, त्याच रुग्णालयात त्यांचा मृतदेह नेण्यात आला.
रंजना तांबे या त्यांच्या आईसोबत डोंबिवलीतील गणेश नगरमधील शिवसागर सोसायटीत राहत होत्या. वयोवृद्ध आईला रंजना तांबे या एकमेव आधार होत्या. घरातील कमावत्या रंजना गेल्याने तांबे कुटुंबाचा आधारच हरपला. आणखी एक हृदय पिळवटून टाकणारी बाब म्हणजे, त्या एका पायाने अपंग होत्या. मात्र, त्या मोठ्या उमेदीने जी. टी. रुग्णालयात रुग्णांची सेवा करीत होत्या. या घटनेनंतर त्यांच्या आईला जबर मानसिक धक्का बसला आहे.
-------------------
MH_Dombivili_WKT_CSMTFobCollapse_RanjanaTambe_AV+WKT_15March2019_PramilaPawar
CSMT Fob Collapse: ...रुग्णालयात कामावर जाण्यासाठी त्या निघाल्या; मात्र पोहोचला तो त्यांचा मृतदेह
डोंबिवली
मुंबई महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा पादचारी पूल कोसळून मृत्यू झालेल्यांमध्ये तीन परिचारिकांपैकी रंजना तांबे या डोंबिवलीमध्ये रहाणाऱ्या होत्या. दिवसभरातील कामे आटोपून त्या कामावर जाण्यासाठी निघाल्या होत्या, मात्र मध्येच त्यांना मृत्यूने गाठलं.
डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या रंजना तांबे या जी. टी. रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होत्या. गुरुवारची संध्याकाळ.. त्यांनी नेहमीप्रमाणे घरातली सर्व कामे आटोपून जी.टी. रुग्णालयात नाईट शिफ्टसाठी त्या निघाल्या. मात्र, आज त्यांच्या नशिबात काही वेगळेच लिहून ठेवले होते. घरातून कामावर जाताना त्या छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पुलावरून निघाल्या. त्याचक्षणी त्यांच्या पायाखालचा पूल कोसळला अन क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या दुर्घटनेत ज्या रुग्णालयात त्या कामासाठी जाणार होत्या, त्याच रुग्णालयात त्यांचा मृतदेह नेण्यात आला.
40 वर्षीय रंजना तांबे या त्यांच्या आईसोबत डोंबिवली मधल्या गणेश नगर इथल्या शिवसागर सोसायटीत रहाणाऱ्या होत्या. हात पाय थकून गेलेल्या आईसाठी रंजना तांबे यांचाच आधार होता. रंजना या कमावणाऱ्या एकटेच असल्याने तांबे कुटुंबाचा आधारच हरपला. आणखी एक हृदय पिळवटून टाकणारी बाब म्हणजे त्या एका पायाने अपंग होत्या तरीही त्या मोठ्या उमेदीने जी. टी. रुग्णालयात रुग्णांची सेवा करीत होत्या. ही घटना कळल्यानंतर त्यांच्या आईला जबर धक्का बसला आहे. तसंच या घटनेमुळे डोंबिवली परिसरात शोकाकुल वातावरण झाले आहे.
------
बातमी साठी व्हिडीओ एफटीपी करीत आहे.
Conclusion: