नाशिक - नाशिक शहर पाेलीस आयुक्तालयाने दिलेल्या परवानगीतील अटी व शर्थींचा भंग करुन जुने नाशिक व भद्रकाली परिसरातील पाच सार्वजनिक मित्र मंडळांवर रंगपंचमीसाठी लाऊडस्पीकर लावल्याने गुन्हा दाखल ( Rang Panchami case filed ) करण्यात आला आहेत. नवजीवन मित्र मंडळ, बालाजी युवक मंडळ, प्रेरणा मित्र मंडळ, सत्यम मित्र मंडळ, नवजीवन मित्र मंडळ आणि शिवसेना युवक मित्र मंडळ अशी गुन्हा दाखल झालेल्या मित्र मंडळांची नावे आहेत. शहर पाेलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेने रंगपंचमी निमित्त या पाच मित्र मंडळांना काही अटी व शर्थींच्या अधीन राहून परवानगी दिली हाेती.
लाऊडस्पिकर वाजविल्याप्रकरणी गुन्हा दाखल - नाशिक पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या परवानगीचे उलंघन करून डिजेची मिरवणूक काढुन रंगपचंमी साजरी करणाऱ्या पाच मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. परवाण्यात मिरवणूक काढू नये डिजे व लाऊडस्पिकर वाजवू नये, पारंपारिक वाद्ये वाजवावीत, अशा स्पष्ट सूचना परवानगीत केल्या हाेत्या. मात्र रंगपंचमीला या पाचही मंडळानी लाऊडस्पिकरवर बँन्जाे लावून उत्सव साजरा केला. याबाबत पाेलिसांककडूनच तक्रारी दाखल करण्यात आल्या असून त्यानुसार या मंडळांवर पाेलिसांच्या परवानगीतील अटींचा भंग तसेच लाऊडस्पिकर वाजविला म्हणूण गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - Nandkishor Chaturvedi: नंदकिशोर चतुर्वेदी भारतातून पसार, ईडीकडून शोध सुरू