ETV Bharat / city

Rana couple sent to judicial custody : राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, राजद्रोहचा गुन्हा - रवी राणा न्यायालयीन कोठडी

राणा दाम्पत्याला ( Rana couple sent to judicial custody ) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेले मातोश्री समोर हनुमान चालीसा वाचणार, अशी घोषणा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( Navneet rana judicial custody ) आणि आमदार रवी राणा ( Rana couple bandra court news mumbai ) यांनी केल्याने शिवसेना विरुद्ध राणा असा सामना रंगला होता. या प्रकरणात राणा ( Ravi rana judicial custody ) दाम्पत्याला चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी खार पोलिसांकडून शनिवारी अटक करण्यात आली. राणा दाम्पत्याची शनिवारची रात्र जेलमध्येच गेली.

Rana couple sent to judicial custody
नवनीत राणा बांद्रा न्यायालय
author img

By

Published : Apr 24, 2022, 1:38 PM IST

Updated : Apr 24, 2022, 2:31 PM IST

मुंबई - राणा दाम्पत्याला ( Rana couple sent to judicial custody ) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेले मातोश्री समोर हनुमान चालीसा वाचणार, अशी घोषणा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( Navneet rana judicial custody ) आणि आमदार रवी राणा ( Rana couple Bandra court ) यांनी केल्याने शिवसेना विरुद्ध राणा असा सामना रंगला होता. या प्रकरणात राणा ( Ravi rana judicial custody ) दाम्पत्याला चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी खार पोलिसांकडून शनिवारी अटक करण्यात आली. राणा दाम्पत्याची शनिवारची रात्र जेलमध्येच गेली. त्यांना आज दुपारी मुंबईतील बांद्रा महानगर दंडाधिकारी न्यायालयात ( Rana couple bandra court news mumbai ) हजर करण्यात आले. न्यायालयाने राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली ( Rana couple judicial custody ) आहे. राणा दाम्पत्यांकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. 29 एप्रिल रोजी जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. नवनीत राणा यांची भायखला कारागृहात, तर रवी राणा यांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी होणार आहे.

  • He (public prosecutor Pradip Gharat) was not able to show even a single word that was uttered allegedly by the Rana couple. The only content of the remand application was that they had prepared to come here for the purpose of chanting Hanuman Chalisa: Rizwan Merchant, advocate pic.twitter.com/RnRGZbq8Kj

    — ANI (@ANI) April 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • For the first time, public prosecutor Pradip Gharat, obviously on instructions from the police dept, argued that the case of the accused falls under 124A, which is sedition: Rizwan Merchant, advocate of Navneet & Ravi Rana pic.twitter.com/88CEi4JHzz

हेही वाचा - Sanjay Raut on Kirit Somaiya : 'हा खोटारडा माणूस' संजय राऊत यांचा किरीट सोमैयांवर निशाणा

राणा दाम्पत्याला आज दुपारच्या सुमारास मुंबईतील ( Navneet rana News Mumbai ) बांद्रा महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर युक्तिवाद सुरू झाला. सरकारी वकील प्रदीप घरात यांच्याकडून 7 दिवसांची पोलीस कस्टडी मागण्यात आली होती. मात्र, राणा दाम्पत्यांकडून अ‍ॅड. मर्चंट यांनी युक्तिवाद करत पोलीस कोठडीला विरोध केला. न्यायालयाने अखेर राणा दाम्पत्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.

राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा - सरकारी वकील प्रदीप घरात यांनी न्यायालयासमोर सांगितले की, नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या विरोधात राजद्रोहचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरून हा गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती प्रदीप घरात यांनी दिली. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. राणा दाम्पत्यांच्या जामीन अर्जावर 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. मात्र, न्यायालयाने ताबडतोब सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. खासदार नवनीत राणा यांची भायखला कारागृहात रवानगी करण्यात येणार, तर आमदार रवी राणा यांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी करण्यात येणार आहे.

अ‍ॅड. रिजवान मर्चेन्ट यांनी न्यायालयासमोर सांगितले की, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे लोकप्रतिनिधी असून यांना अटक करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 41 ची नोटीस देणे बंधनकारक आहे. मात्र, पोलिसांकडून राणा दाम्पत्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस देण्यात आली नाही. त्यामुळे, राणा दाम्पत्यावर करण्यात आलेली अटकेची कारवाई ही बेकायदेशीर आहे. तसेच, पोलिसांकडून राजकीय दबावामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे, असा युक्तिवाद नवनीत राणा यांच्या वकिलांकडून आज न्यायालयासमोर करण्यात आला.

मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून समाजात तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्य केल्याप्रकरणी राणांना अटक करण्यात आली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर कलम 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा ठपका राणा दाम्पत्यावर ठेवण्यात आला आहे. एखादे प्रक्षोभक वक्तव्य करून जर दोन समाजामध्ये तेढ निर्माण केला जात असेल तेव्हा हे कलम लावले जाते. या गुन्ह्यामध्ये पोलिसांना जामीन देण्याचा अधिकार नसल्याने आरोपीला न्यायालयासमोर हजर करावे लागते. पोलीस कोठडी हवी असल्यास तशी मागणी पोलीस करू शकतात.

दरम्यान एकीकडे राणा दाम्पत्याला खार पोलीस स्टेशनमध्ये अटक केल्यानंतर दुसरीकडे राणा दाम्पत्याने उलट तक्रार नोंदवली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि परीवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात राणा दाम्पत्याने तक्रार दाखल केली आहे. या शिवाय घरावर हल्ला केल्याचा आरोप करत शिवसैनिकांविरोधातही तक्रार दाखल केली आहे. संजय राऊतांनी शिवसैनिकांना चिथावल्याचे आणि मुख्यमंत्र्यांनी जिवे मारण्यासाठी कट रचल्याचा आरोप राणांनी आपल्या तक्रारीत केला आहे. त्यामुळे, आता खार पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत.

मुंबईत येऊन मातोश्री बंगल्यावर हनुमान चालिसा पठण करणार, असा निर्धार राणा दाम्पत्याने केला होता. त्यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा दोघेही गनिमी काव्याने मुंबईत आले होते. काल दिवसभरात ते आपल्या घरातून बाहेर पडू शकले नाहीत. मुंबईत मातोश्री बंगला परिसर आणि नवनीत राणा यांचे निवासस्थान असलेल्या खारमध्ये हायव्होल्टेज ड्रामा झाला. शिवसैनिकांनी गर्दी करत खडा पहारा दिला. नवनीत कौर आणि रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठणचा निर्धार केला होता. शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांच्या खारमधील घरासमोरही जोरदार घोषणाबाजी झाली आणि संध्याकाळनंतर दोघांनाही पोलिसांनी अटक केली. हे सगळे घडत असतनाच भाजप नेत्यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली, ज्यामुळे राज्यात नवा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी केला आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत, तसेच अनिल परब यांच्याविरोधात राणा दाम्पत्याने तक्रार दाखल केली आहे. तसेच, अज्ञात अशा 500 ते 600 शिवसैनिकांविरोधातही त्यांनी तक्रार दाखल केली आहे. मारहाण करून हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यासाठी शिवसैनिकांनी रुग्णवाहिका आणली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा - Somaiya Criticizes Government : माझ्यावरील हल्ला ठाकरे सरकार प्रायोजित, पोलिस आयुक्त जवाबदार - सोमय्या

Last Updated : Apr 24, 2022, 2:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.