ETV Bharat / city

Ramdas Kadam: न्यायालय संख्याबळानुसार निकाल देते; रामदास कदम यांची न्यायालयातील सुनावणीवर प्रतिक्रिया

author img

By

Published : Aug 3, 2022, 4:01 PM IST

Updated : Aug 3, 2022, 4:11 PM IST

शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात झालेली सुनावणी उद्यावर गेली आहे. विधिमंडळाच्या निर्णयाने न्याय होईल, असा आशावाद बंडखोर शिंदे गटाचे नेते रामदास भाई कदम यांनी व्यक्त केला आहे. ( Hearing on Shinde Group in Supreme Court ) दरम्यान, उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम

मुंबई - सर्वोच्च न्यायालयात आज बुधवार (दि. 3 ऑगस्ट)रोजी शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिकांवर सरन्यायाधीश रमण्णा यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी झाली. शिवसेना कोणाची वाद रंगला असून कडून कपिल सिब्बल, मनुसिंग सिंगवी यांनी शिवसेना तर हरीश साळवे यांनी बंडखोर गटाच्या बाजूने युक्तिवाद केला. ( Ramdas Kadam's response ) साळवे यांच्या सरन्यायाधीश आणि टिप्पणी करताना लिखित स्वरूपात माहिती उद्या सादर करण्याची सूचना केली आहे.

पत्रकारांशी बोलताना रामदास कदम

शिंदे गटाच्या नेत्यांनी लक्ष देऊ नये - आजची सुनावली उद्यावर ढकलली आहे. बंडखोर गटाचे नेते रामदास भाई कदम यांनी भाष्य केले. गेल्या 32 वर्षाचा माझा अनुभव आहे. संख्याबळानुसार निकाल जाहीर करते. विधिमंडळात आमच्याकडे सर्वाधिक संख्याबळ आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या नियमानुसार निर्णय होईल असे कदम म्हणाले आहेत. उदय सामंत त्यांच्यावरती झालेला हल्ला निषेधार्थ आहे. हातात काही राहिले नाही. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यभरात प्रतिसाद मिळत असल्याने हल्ले होत आहेत. या गोष्टीकडे शिंदे गटाच्या नेत्यांनी लक्ष देऊ नये अशी प्रतिक्रिया कदम यांनी दिली आहे.

सुभाष देसाई जागे झाले आणि तोंड उघडले हे खूप झाले - महाराष्ट्रातील विकासकामे करण्यासाठी झोकून देऊन काम करावे. हातात दगड घेऊन हल्ला करणे हे मर्दागीचे लक्षण नाही. अंगावर आला तर शिंगावर घ्यायचे असेल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवले आहे, असा सूचक इशारा रामदास कदम यांनी दिला आहे. शिंदे गटावर टीका करणारे सुभाष देसाई जागे झाले आणि तोंड उघडले हे खूप झाले. कॅबिनेटमध्ये झोपा काढणारा माणूस त्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे कदम म्हणाले.

हेही वाचा - Supreme Court Hearing : लोकशाहीच्या दृष्टीने लवकरात लवकर निर्णय व्हावं - घटनातज्ज्ञ उल्हास बापट

Last Updated : Aug 3, 2022, 4:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.