मुंबई - देशभरात तसेच महाराष्ट्रात कोरोना हा रोग थैमान घालत आहे. यामुळे देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्यात याचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. आज गुढीपाडव्याचा सण आहे. मात्र, गुढीपाडव्याला कोणत्याही प्रकारचा उत्साह महाराष्ट्रात दिसत नाही. त्याच प्रकारे महाराष्ट्रात गुढीपाडव्याला होणारा मनसेचा महामेळावा देखील रद्द झाला आहे. गुढीपाडव्याला शिवाजी पार्क येथे मनसेचा भव्य महामेळावा असतो. या मेळाव्याला राज्यातून हजारो कार्यकर्ते येत असतात. मात्र, कोरोनाच्या सावटामुळे यंदा हा मेळावा झालेला नाही. याचा आढावा प्रतिनिधींनी घेतला आहे.
कोरोनाचा सावट ; पाडव्यानिमित्त मनसेची डरकाळी होणार नाही - MNS rally canceled
देशभरात आणि महाराष्ट्रत कोरोना या रोगाने थैमान घातले आहे. यामुळे सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले असून गुढीपाडव्याला होणारा मनसेचा मेळावा रद्द करण्यात आला आहे.