ETV Bharat / city

Rakesh Jhunjhunwla वडिलांच्या कानपिचक्या टाटांना टक्कर बिग बुलचा थक्क करणारा प्रवास - राकेश झुनझुनवाला नेट वर्थ

सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक राकेश झुनझुनवाला Rakesh Jhunjhunwala यांचे निधन झाले मात्र अनेक अडचणीवर मात करत केलेल्या उत्तुंग व्यक्तीमत्वाचा थक्क करणारा प्रवास आपण जाणून घेणार आहेत

Rakesh Jhunjhunwla
Rakesh Jhunjhunwla
author img

By

Published : Aug 14, 2022, 3:58 PM IST

मुंबई - देशातील आणि जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक राकेश झुनझुनवाला Rakesh Jhunjhunwala यांचे रविवारी वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले अवघे पाच हजार रुपये घेऊन शेअर बाजारात उतरले आणि उभी केली जीवनाची यशोगाथा अडचणीवर मात करत केलेल्या उत्तुंग व्यक्तीमत्वाचा थक्क करणारा प्रवास आपण जाणून घेणार आहेत

अशी मिळाली आयुष्याला कलाटणी शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांपैकी अनेक जण राकेश झुनझुनवाला यांचा जीवनपट पाहून गुंतवणूक करतात झुनझुनवाला यांचा जन्म ५ जुलै १९६० रोजी मुंबईत झाला. वडील आयकर विभागात अधिकारी होते आणि ते शेअर बाजारात गुंतवणूक करायचे येथूनच राकेश झुनझुनवाला यांच्या प्रवासाची सुरुवात झाली वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर त्यांनी १९८५ मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियामधून चार्टंड अकाऊंटंटचा कोर्स केला त्यानंतर त्यांनी शेअर बाजारात पाय रोवण्याचा निर्णय घेतला मात्र वडिलांनी पैसे देण्यास थेट नकार दर्शवला आधी स्वत: पैसे कमव आणि मग शेअर बाजारात प्रवेश कर अशा शब्दांत राकेश झुनझुनवाला यांना कानपिचक्या दिल्या वडिलांना मोठे होऊन दाखवेन असे ध्येय बाळगून त्यांनी शेअर बाजारात प्रथमच पाच हजार रुपये गुंतवले १९८६ चा टाटा टीचे शेअर्स ४३ रुपयांना विकत घेतले त्या काळी पाच हजारात त्यांनी १४३ रुपये प्रति शेअर्स नफा मिळवला १९८६ ते १९८७ वर्षात सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचा त्यांना नफा झाला सेसा स्टारलिट कंपनीचे चार लाख शेअर एक कोटी रुपयांना विकत घेतले या गुंतवणुकीत भरघोस नफा कमावला हेच यश त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले

सक्रीय गुंतवणूकदार ​राकेश झुनझुनवाला हे सक्रिय गुंतवणूकदार असण्यासोबत एक यशस्वी उद्योजक व्यावसायिक होते झुनझुनवाला हे अॅपटेक लिमिटेड आणि हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड​चे​ अध्यक्ष होते प्राइम फोकस लिमिटेड जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस बिलकेअर लिमिटेड प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड प्रोव्होग इंडिया लिमिटेड कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजीज लिमिटेड मिड डे मल्टीमीडिया लिमिटेड नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड विकाअर हॉटेल्स लिमिटेड आदी कंपन्याच्या संचालक मंडळावर ते होते राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांची टायटन कंपनीमध्ये ​५.५ टक्के भागीदारी होती झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमध्ये ​२६​ जुलै ​२०२२​ मध्ये टायटनचे एकूण मूल्य अंदाजे ​१० ​हजार ​३००​ कोटींच्या आसपास होते स्टार हेल्थमध्ये त्यांची ​१४.३९ टक्के भागिदारी होती​​

टाटांना टक्कर राकेश झुनझुनवाला यांनी २००३ मध्ये टाटा समूहाची आणखी एक कंपनी टायटन कंपनीत गुंतवणूक केली या एका शेअरने त्यांचे नशीबच पालटवले त्यांनी सहा कोटी शेअर्स प्रत्येकी तीन रुपये दराने खरेदी केले आज त्या एका शेअरची किंमत १,९६१ रुपये इतकी आहे हा स्टॉक त्यांचा आवडता स्टॉक म्हणून ओळखला जात होता त्यांच्या पोर्टफोलिओ मध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स होते सेल टाटा मोटर्स टाटा कम्युनिकेशन्स लुपिन टीव्ही १८ डीबी रियल्टी इंडियन हॉटेल्स इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स फेडरल बँक करूर वैश्य बँक एस्कॉर्ट्स लिमिटेड टायटन कंपनी आदी कंपन्यांचा यात समावेश आहे पुढे विमान वाहतूक क्षेत्रात टाटा समूहाला आव्हान देत परवडणारी सेवा पुरवणे उद्दिष्ट्ये ठेवले ते साध्य करण्यासाठी आकासा एअर वाहतूक सेवा सुरु केली सुमारे ५० मिलीयन डॉलर्स इतकी यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे

मलबार हील येथे घराचे स्वप्न मलबार हिल हा मुंबईतील सर्वात महागडा परिसर मानला जातो येथे एका चौरस फुटाची किंमत एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अनेक उद्योगपती आणि कॉर्पोरेट जगतातील नामवंत व्यक्ती या भागात राहतात हे घर बांधण्यासाठी झुनझुनवाला यांनी ३७१ कोटी रुपयांना जमीन खरेदी केली होती सर्वात महागड्या भागात १४ मजली आलिशान घर बांधण्याचे त्यांचे स्वप्न होते लवकरच त्यांचे नवीन निवासस्थान मलबार हिलमध्ये होईल सध्या ते एका अपार्टमेंट ब्लॉकमध्ये दुमजली घरात राहत होते झुनझुनवाला यांनी तीन बॉलीवूड चित्रपट प्रोड्युस केले होते इंग्लिश विंग्लिश शमिताभ आणि की अँड का यांचा समावेश आहे त्यांना खाण्यापिण्याची खूप आवड होती त्यांना स्ट्रीट फूड डोसा आणि चायनीज फूड खूप आवडायचे मुंबईची पावभाजी हा तर त्यांचा विक पॉईंट होता फावल्या वेळात ते फूड शो पाहायचे

हेही वाचा Rakesh Jhunjhunwala Property राकेश झुनझुनवाला यांच्या संपत्तीचा आकडा जाणून होताल थक्क

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.