ETV Bharat / city

राज्यसभा निवडणूक: महाराष्ट्रातील विजय 'आनंदाचा क्षण' - देवेंद्र फडणवीस

author img

By

Published : Jun 11, 2022, 6:27 AM IST

Updated : Jun 11, 2022, 8:41 AM IST

माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राज्यातील राज्यसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयाचे कौतुक केले आणि हा आनंदाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्रातील विजय 'आनंदाचा क्षण' - देवेंद्र फडणवीस

मुंबई: विरोधीपक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राज्यातील राज्यसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयाचे कौतुक केले आणि हा आनंदाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. "भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाल्याने आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे," असे फडणवीस म्हणाले. त्यांनी पक्षाच्या मतातील वाटाही अधोरेखित केला.

  • "I want to thank former Maharashtra CM Devendra Fadnavis, state party chief Chandrakant Patil and the entire team for the victory," says Union Minister Piyush Goyal after winning #RajyaSabhaPolls from Maharashtra pic.twitter.com/5A8os9negq

    — ANI (@ANI) June 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
गोयल यांना राउतांपेक्षा जास्त मते -
"पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना प्रत्येकी 48 मते मिळाली आहेत. आमच्या तिसर्‍या उमेदवाराला शिवसेनेच्या संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली आहेत," असेही ते म्हणाले. तर काँग्रेस नेते इम्रान प्रतापगढ़ी यांनी आपला विजय नोंदवला आणि उर्वरित उमेदवारांची संख्या निश्चित केली.
  • राज्यसभा निवडणुकीत तिसरी जागाही जिंकणार, हे आम्ही ठामपणे सांगत होतो. आवश्यक नियोजन करून आम्ही विजय मिळवला, त्याचं श्रेय @Dev_Fadnavisजींच्या रणनीतीला. मविआची मतं फुटली नाहीत, भाजपा अधिक विश्वासार्ह पर्याय वाटल्यानं ती आम्हाला मिळाली!
    सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा! pic.twitter.com/yPXA4iedsG

    — Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महाडिक गोयल यांनी मानले आभार - विजयानंतर भाजप नेते धनंजय महाडिक आणि पियुष गोयल यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. त्यांची रणनिती कामी आल्याने विजय झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

चंद्रकात पाटील यांचे विजयी ट्विट - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विजयानंतर ट्विट करुन अभिनंदन केले. त्याचवेळी या विजयाचे शिल्पकार विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये आवर्जून नमूद केले आहे.

मुक्ता टिळक यांची प्रतिक्रिया - भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी राज्यसभेचे मतदान केले. त्या आजारी असल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून मतदानासाठी यावे लागले. त्यांनी आपल्या भावना ट्विटमधून व्यक्त केल्यात.

  • राज्यसभा निवडणुकीत आज मतदान करण्याची घटनात्मकरित्या असलेली प्रक्रिया पार पाडून पक्षाप्रती असलेली जबाबदारी पूर्ण केली.

    आजच्यासारखे मतदान करावे लागेल, असे कधी वाटले नव्हते.

    देश आणि पक्षाच्या भल्यासाठी मी सदैव कटिबध्द आहे. https://t.co/zERuEgBMOV

    — Mukta Tilak (@mukta_tilak) June 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रतापगढी काय म्हणाले - "मी तसेच शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल विजयी झाले आहेत. मी आमदारांचे आभार मानतो. (महाविकास आघाडी)चे चौथे उमेदवार संजय पवार जिंकू शकले नाहीत याचे आम्हाला दुःख आहे," असे प्रतापगढी म्हणाले.

भाजपने राज्यातून डॉ अनिल बोंडे, पियुष गोयल आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली होती. विशेष म्हणजे राज्यातील सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात होते.

दुसरीकडे, काँग्रेसने इम्रान प्रतापगढ़ी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते, तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यात आलीे. या निवडणुकीत शिवसेनेचे संजय राऊत यांना बाजी मारली.

मुंबई: विरोधीपक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राज्यातील राज्यसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयाचे कौतुक केले आणि हा आनंदाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. "भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाल्याने आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे," असे फडणवीस म्हणाले. त्यांनी पक्षाच्या मतातील वाटाही अधोरेखित केला.

  • "I want to thank former Maharashtra CM Devendra Fadnavis, state party chief Chandrakant Patil and the entire team for the victory," says Union Minister Piyush Goyal after winning #RajyaSabhaPolls from Maharashtra pic.twitter.com/5A8os9negq

    — ANI (@ANI) June 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
गोयल यांना राउतांपेक्षा जास्त मते - "पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना प्रत्येकी 48 मते मिळाली आहेत. आमच्या तिसर्‍या उमेदवाराला शिवसेनेच्या संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली आहेत," असेही ते म्हणाले. तर काँग्रेस नेते इम्रान प्रतापगढ़ी यांनी आपला विजय नोंदवला आणि उर्वरित उमेदवारांची संख्या निश्चित केली.
  • राज्यसभा निवडणुकीत तिसरी जागाही जिंकणार, हे आम्ही ठामपणे सांगत होतो. आवश्यक नियोजन करून आम्ही विजय मिळवला, त्याचं श्रेय @Dev_Fadnavisजींच्या रणनीतीला. मविआची मतं फुटली नाहीत, भाजपा अधिक विश्वासार्ह पर्याय वाटल्यानं ती आम्हाला मिळाली!
    सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा! pic.twitter.com/yPXA4iedsG

    — Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महाडिक गोयल यांनी मानले आभार - विजयानंतर भाजप नेते धनंजय महाडिक आणि पियुष गोयल यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. त्यांची रणनिती कामी आल्याने विजय झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

चंद्रकात पाटील यांचे विजयी ट्विट - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विजयानंतर ट्विट करुन अभिनंदन केले. त्याचवेळी या विजयाचे शिल्पकार विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये आवर्जून नमूद केले आहे.

मुक्ता टिळक यांची प्रतिक्रिया - भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी राज्यसभेचे मतदान केले. त्या आजारी असल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून मतदानासाठी यावे लागले. त्यांनी आपल्या भावना ट्विटमधून व्यक्त केल्यात.

  • राज्यसभा निवडणुकीत आज मतदान करण्याची घटनात्मकरित्या असलेली प्रक्रिया पार पाडून पक्षाप्रती असलेली जबाबदारी पूर्ण केली.

    आजच्यासारखे मतदान करावे लागेल, असे कधी वाटले नव्हते.

    देश आणि पक्षाच्या भल्यासाठी मी सदैव कटिबध्द आहे. https://t.co/zERuEgBMOV

    — Mukta Tilak (@mukta_tilak) June 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रतापगढी काय म्हणाले - "मी तसेच शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल विजयी झाले आहेत. मी आमदारांचे आभार मानतो. (महाविकास आघाडी)चे चौथे उमेदवार संजय पवार जिंकू शकले नाहीत याचे आम्हाला दुःख आहे," असे प्रतापगढी म्हणाले.

भाजपने राज्यातून डॉ अनिल बोंडे, पियुष गोयल आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली होती. विशेष म्हणजे राज्यातील सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात होते.

दुसरीकडे, काँग्रेसने इम्रान प्रतापगढ़ी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते, तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यात आलीे. या निवडणुकीत शिवसेनेचे संजय राऊत यांना बाजी मारली.

Last Updated : Jun 11, 2022, 8:41 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.