ETV Bharat / city

Rajya Sabha elections : अफवा पसरवून परिवर्तन होईल असे, भाजपला वाटतय - जयंत पाटील

राज्यसभेच्या निवडणुकीत ( Rajya Sabha elections 2022 ) महाविकास आघाडीमध्ये मतभेद ( Differences ) असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत. अफवा पसरून परिवर्तन होईल असे भाजपला वाटते आहे. मात्र, आमच्या चारही जागा निवडून येतील, ( All four seats elected ) असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( State President of NCP Jayant Patil ) यांनी व्यक्त केला. विधिमंडळात ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

Jayant Patil
जयंत पाटील
author img

By

Published : Jun 10, 2022, 3:02 PM IST

मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये ( Mahavikas Aghadi ) मतभेद असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत. अफवा पसरून परिवर्तन होईल असे भाजपला वाटत आहे. मात्र आमच्या चारही जागा निवडून येतील, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( State President of NCP Jayant Patil ) यांनी व्यक्त केला. विधिमंडळात हे प्रसार माध्यमांशी बोलत होते.

आज सकाळपासून मतदानाला सुरुवात - विधानसभेतून राज्यसभेवर जाणाऱ्या सहा जागांसाठी आज सकाळपासून मतदानाला ( Voting for six seats in rajya sabha ) सुरुवात झाली आहे. या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर खुलासा केला. महाविकास आघाडीने चर्चा करून निर्यण घेतल्याचे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचा विजय होणार - शिवसेनेचे दोन्ही उमेदवार जिंकतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीत मतभेद असल्याच्या बातम्या भाजपकडून पेरल्या जात आहेत. जेणेकरून मत परिवर्तन होईल, असे भाजपला वाटत आहे. मात्र, त्यांचा हा भ्रम असून महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील. आमचा विजय नक्की होणार असल्याचे ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्री नाराज असल्याच्या चर्चेला पूर्णविराम देताना ते म्हणाले, प्रत्येकजण मत व्यक्त करत असतो असे, सांगत त्यांनी वादावर पडदा टाकला.

शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेंडके नाराज असूच शकत नाहीत. नवाब मलिक, अनिल देशमुख ( Nawab Malik, Anil Deshmukh ) यांच्या संदर्भात न्यायालयात प्रक्रिया सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणी नाराज नाही. संध्याकाळी चार नंतर सगळे चित्र स्पष्ट होईल. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निश्चित निवडून येतील, असे जयंत पाटील म्हणाले. भाजपकडून एमआयएम महाविकास आघाडीची बी टीम ( B team MIM Mahavikas Aghadi ) असल्याचा आरोप होत आहे. या सगळ्या प्रश्नाची उत्तरे त्यांना संध्याकाळी ४ नंतर उत्तर देईन, असे पाटील म्हणाले. आत्तापर्यंत १७५ हून अधिक आमदारांनी मतदान केले आहे. काँग्रेस ४२, भाजप ९५, तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांनीही मतदानाचा हक्क बाजवला आहे.

हेही वाचा - Rajya Sabha Election : नवाब मलिकांना न्यायालयाचा झटका: न्यायाधिशांनी केली प्रश्नांची सरबत्ती, वाचा न्यायालयातील घडामोडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.