ETV Bharat / city

Rajya Sabha candidate assets : राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले प्रफुल्ल पटेल, पीयूष गोयल 'इतक्या' कोटींचे मालक - पीयूष गोयल संपत्ती

राज्यसभेच्या रिंगणात ( Rajya Sabha candidate assets ) उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल ( Praful patel assets ) आणि केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते पीयूष गोयल ( Piyush goyal assets ) हे शेकडो कोटींचे मालक आहेत. पटेल यांच्याकडे ३४० तर गोयल ( Piyush goyal property news ) यांच्याकडे १०० कोटींच्या पुढे मालमत्ता आहे. विशेष म्हणजे, पटेलांच्या ( Praful patel property news ) नावावर एकही गाडी नाही, तर गोयल यांच्याकडे ८६ लाखांची दोन दोन वाहने असून गेल्या सहा वर्षांत घसघशीत वाढ झाली आहे.

rajya sabha election candidate piyush goyal assets
प्रफुल पटेल आणि पीयूष गोयल
author img

By

Published : May 31, 2022, 9:10 AM IST

मुंबई - राज्यसभेच्या रिंगणात ( Rajya Sabha candidate assets ) उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल ( Praful patel assets ) आणि केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते पीयूष गोयल ( Piyush goyal assets ) हे शेकडो कोटींचे मालक आहेत. पटेल यांच्याकडे ३४० तर गोयल ( Piyush goyal property news ) यांच्याकडे १०० कोटींच्या पुढे मालमत्ता आहे. विशेष म्हणजे, पटेलांच्या ( Praful patel property news ) नावावर एकही गाडी नाही, तर गोयल यांच्याकडे ८६ लाखांची दोन दोन वाहने असून गेल्या सहा वर्षांत घसघशीत वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाच्या नामनिर्देशन अर्जात माहिती नमूद केली आहे.

हेही वाचा - Mumbai Municipal Corporations School : मुंबई महापालिकेच्या शाळांना अच्छे दिन: ३५ हजार विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

राज्यसभेसाठी दहा जूनला निवडणुका होणार आहेत. उमेदवारी अर्ज ( Rajya Sabha election candidate ) दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अखेरच्या दिवशी अर्ज करून घाईगडबड टाळण्यासाठी राजकीय पक्षांकडून एक दिवस अगोदरच नामांकन अर्ज दाखल केले. उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी आणि भाजपच्या पीयूष गोयल ( Rajya Sabha election candidate Piyush Goyal ), अनिल भोंडे आणि धनंजय महाडिक यांचा समावेश आहे. शिवसेनेने दोन दिवस अगोदरच नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. तगड्या उमेदवारांमध्ये प्रफुल्ल पटेल आणि पीयूष गोयल हे दोन गर्भश्रीमंत उमेदवार उतरले आहेत.

पीयूष गोयल यांची मालमत्ता - पीयूष गोयल केंद्रात मंत्री आहेत. महाराष्ट्र राज्य विधानसभेतून ते राज्यसभेत गेले आहेत. यावेळी पुन्हा संधी त्यांना देण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षांत त्यांच्या मालमत्तेत लक्षणीय वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या ढोबळ मिळकतीनुसार ३८ लाखांवरून ६२ लाख अशी मोठी वाढ झाली आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांच्याकडे ९० कोटींची मालमत्ता होती. ही आता शंभर कोटींच्या पलिकडे गेली आहे.

गोयल यांच्याकडे टोयोटा करोला एल्टीस, टोयोटा केंब्रिजच्या दोन अशा ८३ लाखांच्या गाड्या आहेत. त्यांची जंगम मालमत्ता २९ कोटींची आणि पत्नीची ५० कोटींची आहे. त्याच्याकडे साडेसात किलो सोन्याचे दागिने असून शहर बाजारात विविध कंपन्यांमध्ये सात कोटींचे शेअर, तसेच मुंबई पुणे येथे घर असून 21 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. मात्र, एकही भूखंड त्यांच्या नावावर नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

प्रफुल पटेल यांची मालमत्ता - प्रफुल पटेल यांनी २०१६ मध्ये राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांच्याकडे २२५ कोटींची मालमत्ता होती. गेल्या सहा वर्षांत सुमारे १८८ कोटींच्‍या मालमत्तेची भर पडली आहे. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या मालमत्ता विवरण पत्रानुसार त्यांची जंगम मालमत्ता ३४ कोटी १२ लाख इतकी तर एकत्रित कुटुंबाची मालमत्ता ८० कोटींच्या पुढे आहे. पटेल दाम्पत्याकडे ७ कोटी ४४ लाखांचे सोने, चांदी, हिऱ्यांचे दागिने आहेत. घरे, जमीन, व्यापार आदी ७५ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. तर १०४ कोटी ५६ लाख मालमत्ता पत्नीच्या नावाने आणि १०७ कोटींची स्थावर मालमत्ता एकत्रित कुटुंबाच्या नावावर आहे. विशेष म्हणजे, पटेल यांच्या नावावर एकही वाहन नसल्याचे नमूद केले आहे.

हेही वाचा - मुंबई महापालिका निवडणूक - आज आरक्षण सोडत, राजकीय पक्ष आणि इच्छुकांचे लक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.