मुंबई : 10 जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा चौथा उमेदवारच विजय होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. अपक्ष तसेच छोट्या पक्षाच्या आमदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहे. मात्र विजय हा महाविकास आघाडीचाचं (Mahavikas Aghadi candidate will win) होईल असही त्यांनी म्हटल. ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे बोलत होते.
समाजवादी, एम आय एम पक्षासोबत चर्चा : समाजवादी पक्ष हा नेहमीच भारतीय जनता पक्षाच्या (Samajwadi Party against BJP) विरोधात उभा राहिला आहे. नेहमीच समाजवादी पक्षाची भूमिका ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असते. त्यामुळे समाजवादी पक्षाचे आमदार मतदान करताना योग्य निर्णय घेतील अशी त्यांनी व्यक्त केली. यासोबतच एमआयएम पक्षाने (MIM) महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करावे यासाठी चर्चा सुरु असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
विधान परिषदेच्या उमेदवारी बाबत राष्ट्रवादीत बातचीत : विधान परिषदेसाठी येत्या 20 जूनला निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेच्या जागेसाठी कोणाला उमेदवारी द्यावी याबाबत पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप कोणाचेही नाव निश्चित झालेलं नाही. लवकरच याबाबत पक्षाकडून निर्णय घेतला जाईल असंही पाटील यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा- rajya sabha election 2022 : अनिल देशमुखांना मतदानाची परवानगी देऊ नये, अभिनेत्री केतकी चितळेच्या वकिलाचा सीबीआय कोर्टात अर्ज