ETV Bharat / city

Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती? वाचा नेमकं काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे... - Maharashtra Corona Update

पाश्चिमात्य देशात कोरोनाचा प्रादुर्भाव ( Corona Increasing In Western Countries ) वाढत असला, तरी महाराष्ट्रात परिस्थिती ( Corona Situation In Under Control In Maharashtra ) नियंत्रणात आहे. त्यामुळे मास्क सक्ती ( No Mask Compulsion ) सध्यातरी लागू केलेली नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

sf
sf
author img

By

Published : Apr 20, 2022, 3:43 PM IST

मुंबई - पाश्चिमात्य देशात कोरोनाचा प्रादुर्भाव ( Corona Increasing In Western Countries ) वाढत असला, तरी महाराष्ट्रात परिस्थिती ( Corona Situation In Under Control In Maharashtra ) नियंत्रणात आहे. त्यामुळे मास्क सक्ती ( Mask ) सध्यातरी लागू केलेली नाही. मात्र, शारीरिक व्याधी असलेले नागरिक, वयोवृद्धांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे गरजेचे आहे, असे राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ( Rajesh Tope On Corona Fourth Wave ) सांगितले. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

केंद्र सरकारने एकूण आठ राज्यांना पत्र - जगभरात कोरोनाची चौथी लाट उसळली आहे. जपान, युरोप, चायनामध्ये कोरोनाचे मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. दिल्लीतदेखील काही भागात रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात मात्र तशी परिस्थिती नाही. एकेकाळी हजारोच्या संख्येने रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत होते. सध्या 150 ते 200 रुग्ण सापडले. त्यापैकी ८५ रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. आयसीएमआर, गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभाग या सर्वांवर लक्ष ठेवून आहे, असे मंत्री टोपे यांनी सांगितले. तसेच केंद्र सरकारने एकूण आठ राज्यांना पत्र दिले आहे. मास्क सक्ती करण्याची सूचना त्यात आहे. महाराष्ट्रात लोकसंख्येच्या स्थितीनुसार मास्क सक्तीचा निर्णय घेतला जाईल. मात्र, वयोवृद्ध नागरिक, सहव्याधी असलेल्यांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे गरजेचे आहे, असे टोपे म्हणाले.

'खासगी रुग्णालयात जाऊन डोस घ्यावा' - महाराष्ट्रात आघाडी सरकारने लहान मुलांच्या लसीकरणावर विशेष भर दिला आहे. लसीकरणाचे प्रमाणही खूप चांगले आहे. १२ ते १५ आणि १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत. शालेय व्यवस्थापनालाहीदेखील तशा सूचना दिल्या आहेत. मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. लसीकरणामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढली आहे. तर दुसरीकडे बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे. ज्यांच्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती कमी आहे, असे वाटत आहे, त्यांनी खासगी रुग्णालयात जाऊन डोस घ्यावा. किमान 200 ते 250 रुपयांपर्यंत हा डोस उपलब्ध केल्याचे टोपे यांनी सांगितले.

हेही वाचा - Mosque Loudspeaker Dispute : 'मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यावर राज ठाकरेंसह सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांसोबत बैठक घेणार'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.