मुंबई - विरारमधील रुग्णालयात लागलेल्या आगीत १३ कोरोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू झालेला असतानाच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही घटना काही नॅशनल न्यूज नाही, असे बेजबाबदार विधान केले आहे. टोपे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. टोपे यांच्या या विधानामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
पंतप्रधान यांच्याशी आज कोविड बाबत बैठक होणार आहे. ऑक्सिजन,रेमडीसीवर, विरार घटने बाबत आम्ही पंतप्रधान यांच्या सोबतच्या बैठकीत चर्चा करू. परंतु, विरारची घटना ही काही नॅशनल न्यूज नाही. ही राज्यातील घटना आहे. राज्य सरकार त्यावर सर्वोतोपरी मदत करेल, असे विधान टोपे यांनी केलं आहे. तसेच राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखाची मदत केली जाईल. तसेच रुग्णालयाने फायर ऑडिट, स्ट्रक्चर ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट केले जाईल. येत्या दहा दिवसांत आगीचा ऑडिट रिपोर्ट मागवण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणाऱ्या आजच्या बैठकीत संख्येप्रमाणे लसीचे वाटप सरकारने करावे, ऑक्सिजन वाटप न्याय्य पद्धतीने करावा अशी मागणी आम्ही करणार आहोत; असेही टोपे म्हणाले.
सर्वाधिक वाचल्या गेलेल्या बातम्या
निवृत्त पोलिसासोबत झालेल्या झटापटीत सराईत गुन्हेगाराचा मृत्यू, बघा थरारक VIDEO
लॉजमधील हाय-प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, ८ तरुणींसह १० जणांना अटक
नवी मुंबईत दोन भाऊ, बहिणीसह तिघांवर कोयत्याने हल्ला, छेड काढल्याची तक्रार केल्याने केला हल्ला
Maharashtralockdown : राज्यात कडक निर्बंध लागू, अशी आहे नवीन नियमावली
गोव्यात नाईट कर्फ्यू लागू, अशी आहे नवीन नियमावली
आता ५० वर्षावरील पोलीसांना "नो फील्ड,ओन्ली ऑफिस ड्युटी" - गृहराज्यमंत्री
कुर्डूवाडीत हिंदू तरुणाने निराधार ख्रिश्चन महिलेवर केले ख्रिश्चन पद्धतीने अंत्यसंस्कार