ETV Bharat / city

राज ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल, 1 जूनला हिप बोनचं ऑपरेशन - राज ठाकरे रुग्णालयात

राज ठाकरे यांना आज लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून पायाच्या आजाराने त्रस्त होते. राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर येणार होते. मात्र, पाय दुखू लागल्याने राज ठाकरेंना अयोध्या दौरा रद्द करावा लागला. त्यानंतर राज ठाकरे यांच्या पायाची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले होते. त्यांच्यावर 1 जून रोजी ऑपरेशन करण्यात येणार आहे.

राज ठाकरे होणार आज लिलावती रुग्णालयात ऍडमिट

author img

By

Published : May 31, 2022, 9:04 AM IST

Updated : May 31, 2022, 11:07 AM IST

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांच्यावर 1 जून रोजी ऑपरेशन करण्यात येणार आहे. राज ठाकरे यांना आज लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून पायाच्या आजाराने त्रस्त होते. राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर येणार होते. मात्र, पाय दुखू लागल्याने राज ठाकरेंना अयोध्या दौरा रद्द करावा लागला. त्यानंतर राज ठाकरे यांच्या पायाची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले होते. अखेर आता या शस्त्रक्रियेची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

राज ठाकरे यांना हिप बोनचा आजार - अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर राज ठाकरे यांनी पुण्यात एक सभा घेतली. या सभेत त्यांनी आपल्याला पायाचा नेमका कोणता आजार झाला आहे हे सांगितलं होतं. राज ठाकरे म्हणाले होते, "मागच्या वेळी असाच काहीतरी कामासाठी मी पुण्यात येत होतो. अचानक वाटेत माझ्या पायाच दुखणं सुरू झालं. या वेदना खूपच जास्त असल्याने मी परत मुंबईत परतलो आणि काही टेस्ट करून घेतल्या. त्यावर डॉक्टरांनी हिप बोनच ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला."

दोन महिने सक्तीची रजा - राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना सुमारे दोन महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मनसेचा अयोध्या दौरा आणि मशिदींवरून सुरू असलेले आंदोलन शांत होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील सभेत आपल्या शस्त्रक्रियेची माहिती दिली होती.

पदाधिकाऱ्यांना होमवर्क - मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, "ऑपरेशननंतर ते पूर्णपणे ठीक होईपर्यंत पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि नेते महाराष्ट्रभर विधानसभा स्तरावर कार्यकर्ता परिषदा घेतील आणि जाहीर सभा घेतील. तसेच, कोणतीही व्यक्ती, कार्यकर्ता किंवा नेता फेसबुक सोशल मीडियावर कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात किंवा पक्षाने दिलेल्या अजेंड्या व्यतिरिक्त कोणत्याही अजेंड्यावर काहीही पोस्ट करू शकत नाही."

हेही वाचा - Raj Thackeray : राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना 'होमवर्क'; सर्व मतदारसंघात मनसेच्या सभा, मेळावे

Last Updated : May 31, 2022, 11:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.