ETV Bharat / city

..तर मनसे स्टाईलने कारवाई करू, मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात राज ठाकरेंचा सरकारला इशारा - Raj Thackeray on udhav thackeray government

महिला बचत गटांना मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणाऱ्या दंडेलशाहीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

Raj Thackeray warns state government
मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात राज ठाकरेंचे सरकारला पत्र
author img

By

Published : Oct 7, 2020, 10:41 PM IST

मुंबई - महिला बचत गटांना मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणाऱ्या दंडेलशाहीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. महाविकास आघाडी सरकारचं अत्यंत दोन महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष होतंय आणि त्या विषयांकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा पत्रप्रपंच केल्याचं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलंय. जर सरकारकडून यावर कारवाई न झाल्यास मनसेच्या पद्धतीने कारवाई करावी लागेल, असा इशाराच राज ठाकरेंनी दिलाय.

महिला बचत गटांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय करणं आणि त्याचा विस्तार करणं ही नित्याची बाब आहे, असं कर्ज घेणाऱ्या माता-भगिनींनी कर्जाचा हप्ता चुकवण्यात कधीच दिरंगाई केलेली नाही. प्रसंगी पोटाला चिमटा काढला असेल पण हप्ते वेळेत भरले आहेत. पण मार्च २०२० पासून कोरोनामुळे केलेलं लॉकडाऊन आणि त्यातून निर्माण झालेलं आर्थिक आरिष्ट यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील महिला बचत गटांचे व्यवसाय जवळपास ठप्प आहेत. त्यामुळे अर्थातच मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले. पण या परिस्थितीचा कसलाही विचार न करता मायक्रो फायनान्स कंपन्यांनी ग्रामीण महाराष्ट्रात दंडेलशाही सुरु केली असल्याचं राज ठाकरे यांनी पत्रातून म्हटलंय.

Raj Thackeray warns state government
मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात राज ठाकरेंचे सरकारला पत्र
कर्जदाराच्या घरी जाऊन दमदाटी करणे, त्याचा चारचौघांच्यात अपमान करणे असले प्रकार सर्रास सुरु आहेत. या विषयीच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या असल्याचे राज ठाकरे म्हणाले. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या दंडेलशाहीवर सरकारने अंकुश ठेवायला हवा, कर्जदाराच्या घरी जाऊन त्याची अब्रू चव्हाट्यावर आणण्याचा अधिकार या कंपन्यांना कोणी दिला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. हा विषय गंभीर आहे आणि हे जर असंच सुरु राहिलं तर लक्षात ठेवा याचे मानसिक आणि सामाजिक परिणाम गंभीर असतील. सरकार म्हणून आता जागे व्हा आणि पोलीस प्रशासनाच्या मार्फत या मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अरेरावीला चाप बसवा अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे केली आहे.

हे जर सरकार म्हणून तुमच्याकडून होणार नसेल तर माझ्या महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या पद्धतीने कारवाई करावी लागेल असा इशारा देण्यात आला आहे. तसंच पूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थाच गेले ६ महिने ठप्प आहे आणि अजूनही अर्थव्यवस्थेला उभारी येण्याची कोणतीही चिन्ह नाहीत. त्यामुळे या माता-भगिनी कर्जाचे हप्ते भरू शकतील याची शक्यता नाही, त्यामुळे या महिलांच कर्ज माफ करण्यासाठीही सरकारने पाऊलं उचलायला हवीत असे राज ठाकरे यांनी म्हटले.

एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मायक्रो फायनान्स कंपन्यांनी बचत गटाच्या महिलांकडून विमा उतरवतो हे सांगून त्या विम्याचा हप्ता गोळा केला आहे. मात्र आज व्यवसाय ठप्प आहे आणि कर्जाचे हप्ते देणं या महिलांना शक्य नाही अशा वेळेस जेंव्हा या महिला विम्याच्या पॉलिसीची मागणी करत आहेत तेंव्हा मायक्रो फायनान्स कंपन्या विम्याचे कागदपत्रं देत नाहीत. या माता-भगिनींनी जरी विम्याची रक्कम अदा केली असली तरी विमाच उतरवला गेला नाहीये अशी शंका राज ठाकरे यांनी उपस्थित केली आहे. या महिलांना विम्याचे कागदपत्रं आणि विमा कवचाचा लाभ देखील मिळायलाच हवा असे राज ठाकरे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.