ETV Bharat / city

MNS Amit Thackeray : मराठी भाषा गौरव दिनी मनसेचा मोठा निर्णय; अमित ठाकरेंकडे दिली नवी जबाबदारी - MNS Amit Thackeray

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेने मोठा निर्णय घेतला आहे. अमित ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडे मनसेच्या विद्यार्थी संघटनेची जबाबदारी दिली ( MNS Student Chief Amit Thackeray ) आहे.

Amit Thackeray
Amit Thackeray
author img

By

Published : Feb 27, 2022, 5:48 PM IST

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Raj Thackeray ) यांचे सुपुत्र अमित ठाकरे ( MNS Amit Thackeray ) यांच्यावर प्रथमच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली ( MNS Student Chief Amit Thackeray ) आहे. आदित्य ठाकरेंच्या धर्तीवर अमित ठाकरेंना राजकारणात प्रस्थापित करायचे आहे. आदित्य ठाकरे यांनीही शिवसेनेच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून राजकीय इनिंगला सुरुवात करत मोठे यश संपादन केले आहे.

तरुणांमध्ये आकर्षण

अमित ठाकरेंबद्दल तरुणांमध्ये प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटनेची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवल्यास मोठ्या संख्येने मराठी तरुण मनसेमध्ये सामील होतील, असा मनसेचा दावा आहे. आगामी 10 प्रमुख महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांची नियुक्ती मनसेसाठी सुद्धा महत्वाची असणार आहे.

MNS Amit Thackeray
अमित ठाकरेंच्या नियुक्तीचे पत्र

मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेला शिवसेनेत प्रवेश

आता अमित यांच्याकडे विद्यार्थी संघटनेची जबाबदारी देऊन मनसेला एक मजबूत पक्ष बनवायचा आहे. नुकतेच मनसेच्या विद्यार्थी संघटना आणि युवा संघटनेशी संबंधित अनेक युवा नेत्यांनी पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. ही गळती थांबवण्यासाठी आणि मराठी तरुणांना मनसेकडे आकर्षित करण्यासाठी अमित ठाकरे यांच्यावर ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, अमित ठाकरेंना दिलेल्या संधीचे सोने करणार का? हे येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा - Fir Against Narayan rane : दिशा सालियनची बदनामी भोवली, राणे पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.