ETV Bharat / city

महाराष्ट्राचे राजकारण तापले; राज ठाकरे, रामदास आठवलेंनी केली गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

author img

By

Published : Mar 20, 2021, 11:29 PM IST

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर, आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. भाजपासह मनसे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर प्रतिक्रिया नोंदवत चौकशी आणि राजीनाम्याची मागणी केली आहे..

raj-thackeray-ramdas-athavale-and-others-demand-resignation-from-maharashtra-hm-anil-deshmukh
महाराष्ट्राचे राजकारण तापले; राज ठाकरे, रामदास आठवलेंनी केली गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एकामागोमाग एक गौप्यस्फोट होताना दिसत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर, आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. भाजपासह मनसे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर प्रतिक्रिया नोंदवत चौकशी आणि राजीनाम्याची मागणी केली आहे.

तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा - राज ठाकरे

"मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कादायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी." अशा आशयाचं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.

Raj Thackeray Ramdas Athavale and others demand resignation from Maharashtra HM Anil Deshmukh

उद्धव ठाकरेंनाही सरकार चालविण्याचा अधिकार राहिला नाही- रामदास आठवले

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. ते आरोप गृहमंत्र्यांनी नाकारले आहेत. मात्र, असा प्रकार देशात कधीच कुठे घडला नाही. या गंभीर आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची यंत्रणा कोलमडली आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्राच्या लौकीकावर कलंक लागला आहे. मुंबई चे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही सरकार चालविण्याचा अधिकार राहिला नाही; अशा आशयाचे ट्विट केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर घेणार राज्यपालांची भेट..

'मुंबईमध्ये एक स्फोटकांनी गाडी सापडली. या प्रकरणी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी रोज नवनवीन माहिती मिळत आहे. या प्रकरणात 22 तारखेला आम्ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार असून त्यांच्यासमोर पक्षाची भूमिका मांडणार आहोत'; असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

चौकशी पासून वाचण्यासाठी खोटे आरोप- अनिल देशमुख

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन परमबीर सिंग यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.

हेही वाचा : गृहमंत्र्यांनी 100 कोटींचे वसुलीचे टार्गेट दिल्याचा परमबीर सिंग यांचा आरोप; अनिल देशमुखांनी 'ही' दिली प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.