ETV Bharat / city

वाढदिवशी भेट न घेण्याचे राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन - मनसे प्रमुख राज ठाकरे

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी, अजूनही संकट टळलेले नाही. अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं मनाला पटत नाही. त्यामुळे वाढदिवशी माझ्या भेटीसाठी येऊ नका. घरीच राहा, सुरक्षीत राहा असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.

राज ठाकरे
राज ठाकरे
author img

By

Published : Jun 11, 2021, 2:09 PM IST

मुंबई - कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी, अजूनही संकट टळलेले नाही. अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं मनाला पटत नाही. त्यामुळे वाढदिवशी माझ्या भेटीसाठी येऊ नका. घरीच राहा, सुरक्षीत राहा असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्रक काढून मनसे सैनिकांना आवाहन केलं आहे. 14 जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस असतो. राज ठाकरे यांच्या वाढदिवशी त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी होते. मात्र कोरोनाचे संकट लक्षात घेता, राज ठाकरे यांनी कार्याकर्त्यांनी आपली भेट घेऊ नये, घरीच राहावे असे आवाहन केले आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

'दरवर्षी माझ्या वाढदिवसाला आपण भेटतो. तुम्ही फार प्रेमाने विविध ठिकाणाहून येतात. मलाही तुम्हाला भेटल्यावर आनंद होतो आणि अंगात नवा उत्साह संचारतो, उर्जा मिळते तशी उर्जा जाहीर सभेतही मिळते. पण तिथे तुम्ही नुसते दिसता, भेटत नाही. म्हणून माझ्या दृष्टीने वाढदिवसाचा दिवस तुमच्या सहवासात, तुम्हाला भेटल्याने खरा साजरा होतो. तुमच्या भेटीची मी वाट पाहात असतो, मात्र हेही वर्ष बिकट आहे. अजूनही कोरोनाने महाराष्ट्राला घातलेला विळखा सोडलेला नाही. लॉकडाऊन उठतो आहे, हळूहळू सगळं पूर्वपदावर यायला लागलं आहे. परंतु परिस्थिती अजूनही गंभीरच आहे.

'आपण सावध असलं पाहिजे'

आजचंच पाहा, महाराष्ट्रात एका दिवसात काल 12,207 नवे रुग्ण सापडले आहेत. सध्या राज्यात 1,64,743 कोरोनाचे एकूण सक्रिय रुग्ण आहेत. अशा वातावरणात वाढदिवस वगैरे साजरा करणे मनाला पटत नाही. माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की समजून घ्याल. हे वातावरणच असं आहे की आपण सावध असलं पाहिजे. खबरदारी घेतली पाहिजे. प्रवास करणं, मोठ्या प्रमाणात गर्दी करणं, गाठी भेटी अशा गोष्टी करणं टाळल्या पाहिजेत. म्हणून मी तुम्हाला अत्यंत मन:पूर्वक आणि आग्रहाची विनंती करेन की माझ्या भेटीसाठी घरी येऊ नका. तुमच्या घरीच राहा, जिथे आहात, तिथे सुरक्षीत राहा. आपल्या कुटुंबीयांची, आसपासच्या परिसरातल्या लोकांची काळजी घ्या. तुम्ही प्रेमाने याल आणि आपली भेट होणार नाही असं नको व्हायला. तुम्ही सर्वांनी या कोरोना काळात जागरुकपणे चांगलं काम केलं, ज्याचा मला फार अभिमान आहे. अशेच काम करत राहा. अजूनही आपली माणसं दु:खात आहेत. कुटुंबातील माणसे गमावल्याचे त्यांना दु:ख आहे. आपल्या पक्षाने देखील कोरोनामुळे अनेक मानसे गमावली आहेत. त्यांच्या कुटुंबाला धीर देण्याचे काम करा. आजवर राखलंत तसंच परिस्थितीचं भान यापुढेही राखा.

'सामाजिक कार्य करत राहा'

थोड्याच दिवसात मी तुम्हाला भेटणार आहे. पक्षाच्या धोरणाविषयी, नव्या कार्यक्रमांविषयी तुमच्याशी मला बोलायचं आहे. तोपर्यंत जिथे आहात तिथेच पूर्ण काळजी घेऊन कामात रहा. महाराष्ट्राला आता आपल्या कामातून एक दिलासा देण्याची आणि आश्वस्त करण्याची गरज आहे. म्हणून समाजोपयोगी कामात रहा. त्याचाच मी वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून आनंदानं स्विकार करेल.'

हेही वाचा - लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात आर्थिक राजधानीत चोरी, रॉबरीच्या गुन्ह्यात वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.