मुंबई - राज कुंद्रा पोर्नोग्राफी केसमध्ये मुंबई क्राईम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने आणखी चार आरोपींना अटक केली आहे. वर्सोवा येथून एका आरोपीला तर बोरिवली परिसरातून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एक कास्टिंग डायरेक्टर आहे. आणि बाकीचे 3 त्याचे सहकारी आहेत.
काय आहे नेमके प्रकरण -
राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानला जात आहे. राज कुंद्राची व्हिआन नावाची कंपनी असून तिचे केनरीन नावाच्या कंपनीसोबत टायअप होते. केनरीन ही कंपनी लंडन स्थित आहे. राज कुंद्राच्या भावोजींच्या मालकीची ही कंपनी आहे. त्याचे हॉट शॉट्स नावाचे एक अॅप होते. (Raj Kundra Pornography Case Mumbai Crime Branch) या कंपनीच्या सर्व कन्टेन्टची निर्मिती, या अॅपचे ऑपरेशन्स, अकाउंटिंग राज कुंद्राच्या मालकीच्या व्हिआन या कंपनीच्या मुंबईतील ऑफिसमधूनच होत होते. या प्रकरणाचा सखोल तपास करीत असताना हे सर्व धागेदोरे सापडले आहेत. यामध्ये काही व्हॉट्सअप ग्रुप, ई-मेल्स, अकाऊंट शीट्स सापडल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने पोर्नोग्राफी तयार करण्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रासह 11 आरोपींना अटक केली आहे.
अशी झाली होती अटक
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 19 जुलै रोजी सोमवारी राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावले होते. त्याच रात्री उशिरा राज कुंद्रा याला अटक करण्यात आली. त्याच्या अटकेच्या 10 तासानंतर नेरुळ परिसरातून रायन थोरपे याला या प्रकरणात अटक करण्यात आली. या दोघांना कोर्टाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आत्तापर्यंत राज कुंद्रासह 11 जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.
फेब्रुवारी 2021 मध्ये राज कुंद्रा विरोधात तक्रार दाखल -
राज कुंद्रा विरोधात फेब्रुवारी, 2019 मध्ये तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीमध्ये राज कुंद्रा अश्लील सिनेमे बनवत असून ते मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रसारित करत आहे, असे आरोप ठेवण्यात आले होते.
शर्लिन चोप्राचीही आठ तास चौकशी -
दरम्यान या प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्राचीही मुंबई पोलिसांकडून तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री चौकशीनंतर तिला सोडण्यात आले. तर गरज पडल्यास पुन्हा चौकशीसाठी बोलावणार असल्याचीही शक्यता आहे. उद्योगपती राज कुंद्रा प्रकरणात शर्लिन चोप्रा हिचेदेखील काही लिंक लागत असल्यामुळे मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने तिची तब्बल आठ तास चौकशी केली. शर्लिन चोप्रा हिला आर्म्स प्राईमसोबत असणाऱ्या संबंधित संदर्भात विचारण्यात आले. त्याचे नियम व अटी शर्ती काय आहेत? यासंदर्भात विचारण्यात आले. तसेच तुम्ही किती व्हिडिओ शूट केले आहेत. त्याच्याकडे प्रॉडक्शनचे भागीदार कोण आहेत? याबाबतही शर्लिनला विचारणा करण्यात आली.
हेही वाचा - गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात; तर ठाण्यात कोपरी पोलिसांचे चौकशीसाठी समन्स