मुंबई - राज्यात वातावरणात बदल झाल्यामुळे पुढील तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 18,19,20 मार्च असा तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. तर कोकणातही पाऊस होण्याचा अंदाज आहे.
तापमानात काही प्रमाणात होईल घट-
पश्चिम चक्रीवादळ निर्माण झालेल्यामुळे राज्यात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. तापमानात देखील काही दिवसात मोठी वाढ दिसून आली आहे. आता पावसाची शक्यता असल्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होईल, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्यम-स्तरीय पश्चिमेकडील वारे आणि खालच्या स्तराच्या पूर्वेकडील वाऱ्याच्या आंतर क्रियेच्या प्रभावामूळे ही परिस्तिथी निर्माण झाली आहे. 18 ते 20 मार्च या कालावधीत मराठवाडामध्ये मेघर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात मेघर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा
17 मार्च
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाहासह हवामान कोरडे राहण्याची शक्यता तर दुसरीकडे विदर्भात काही ठिकाणी तुरळक सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
18 मार्च
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाहासह हवामान कोरडे राहण्याची शक्यता तर दुसरीकडे विदर्भात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटसह तुरळक सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
19 मार्च
कोकण, गोवा याठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता मध्य महाराष्ट्र, मराठवाहासह विदर्भात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
20 मार्च
कोकण, गोवा याठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता मध्य महाराष्ट्र, मराठवाहासह विदर्भात काही ठिकाणी मुलीचे कडकडाटासह गारा पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
हेही वाचा- स्कॉर्पिओ सापडण्यापासून वाझेंच्या अटकेपर्यंत, असा राहिला घटनाक्रम