मुंबई - मुंबईत आजही मुसळधार पाऊस पडणे सुरूच आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून कुलाबा येथे ( Heavy rain colaba ) विक्रमी पाऊस पडला आहे. कुलाब्यात ( Colaba Rain ) गेल्या 8 वर्षांतील जुलै महिन्यातील सर्वाधिक एकदीवसीय 227 मि.मी इतका पाऊस ( Rain in Mumbai ) पडला आहे. याअगोदर कुलाबा येथे असा पाऊस 2014 साली जुलै महिन्यात बरसला होता. पावसामुळे सध्या मुंबईची तुंबई झाली आहे. पुढील २४ तासांत आणखी पाऊस पडण्याची शक्यता काल व्यक्त करण्यात आली होती.
हेही वाचा - Mumbai Apmc Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये, तोंडली, सुरण, पडवळचे भाव वाढले
गेल्या २४ तासांत कुलाबा येथे २२७.८ मि.मी पाऊस - मुंबईत ११ जूनला पावसाला सुरुवात झाली होती. मात्र, त्यानंतर पावसाने दांडी मारली होती. बुधवारी २९ जूनपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. गुरुवारी पावसामुळे मुंबईमधील अनेक भागात पाणी साचले होते. गेल्या २४ तासांत कुलाबा येथे २२७.८ तर, सांताक्रूझ येथे १७५.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कुलाबा येथे २८.२, सांताक्रूझ येथे ५१.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पालिकेच्या पाऊस मोजणी केंद्रांवर शहर विभागात ४६, पूर्व उपनगरात ५५, पश्चिम उपनगरात ६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज कमी प्रमाणात पाऊस पडल्याने मुंबई शहर व उपनगरातील रेल्वे, रस्ते वाहतूक सुरळीत सुरु आहे, अशी माहिती पालिकेच्या आपतकालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
पाण्याचा निचरा संथगतीने - मुंबई शहर, उपनगरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहरात सायन रोड नंबर २४, पूर्व उपनगरात -चेंबूर फाटक, सुंदरबाग कमानी, पश्चिम उपनगरात - सरोदापाडा, विरादेसाई रोड येथे साचलेल्या पाण्याचा संथ गतीने निचरा होत आहे. शहरात ३ पूर्व, उपनगरात १ एकूण ४ ठिकाणी घरांचा काही भाग पडल्याच्या घटना घडल्या आहेत. संबंधित विभागामार्फत घटनास्थळी मदतकार्य रवाना करण्यात आले आहे.
२३ ठिकाणी झाडे पडली - शहारात ५, पूर्व उपनगरात ९, पश्चिम उपनगरात ९, अशा एकूण २३ ठिकाणी झाडे पडण्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. सर्व तक्रारी पडताळणीकरिता संबंधित विभागांना कळविण्यात आल्या आहेत. झाडे उचलण्याचे काम सुरू असून यात कोणालाही मार लागलेला नाही. शहरात २ ठिकाणी शॉर्टसर्किट होण्याच्या घटना घडल्या आहेत. संबंधित विद्युत पुरवठा यंत्रणांना कळवून मदतकार्य रवाना करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांकरिता वर्तविलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहर, उपनगरात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर, काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
पावसामुळे दाणादान - गुरुवारी सकाळी ८ ते आज शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात मुंबई शहरात १७९.१३, पूर्व उपनगरात १०९.०६ तर पश्चिम उपनगरात १४०.५८ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. सतत पडणाऱ्या पावसामुळे मिलन सबवे परिसरात पाणी तुंबले होते. अर्ध्या तासात पाण्याचा निचरा झाल्यानंतर मिलन सबवे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. रात्री ८ नंतर जोरदार पाऊस पडल्याने दादर हिंदमाता, काळाचौकी, दादर, शीव स्थानक, शीव-माटुंगादरम्यान, हिंदमाता, माहीम, भक्ती पार्क, दादर-परळ दरम्यान, कुर्ला-शीव दरम्यान, एस व्ही रोड (अंधेरी पश्चिम), कुर्ला एल वॉर्ड परिसर आदी सखल विभागात पाणी साचले होतो. दरम्यान काळबादेवी बादमवाडी, सायन येथे दोन इमारतींचा काही भाग कोसळल्याचा घटना घडल्या आहे. तसेच पेडर रोड येथे दरड कोसळली. या दुर्घटनांमध्ये कोणीही जखमी झाल्याची माहिती उपलब्ध नाही.
मुंबईतील काही भागात 30 जून ते 1 जुलै दरम्यान पडलेला पाऊस (सकाळी 8 ते दुसऱ्या दिवशी 8 पर्यंतची नोंद)
मुंबईतील काही भाग | पडलेला पाऊस (मि.मी) |
दादर | 238 |
वांद्रे | 198.7 |
लोअर परेल, वरळी | 208 |
मरीन लाईन्स | 188 |
भायखळा | 189 |
परेल | 170 |
कुर्ला | 120 |
मलाड | 119 |
घाटकोपर | 114 |
मुलुंड | 83.5 |
भांडूप | 77.5 |
हेही वाचा - Uddhav in Action : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दणका, शिवसेनेच्या नेते पदावरून उचलबांगडी