ETV Bharat / city

मुंबईत पावसाची जोरदार हजेरी, २ जण जखमी, १०० लोकांचे स्थलांतर - rain mumbai

हवामान विभागाने मुंबईत सोमवारी आणि मंगळवारी पावसाचा यलो अलर्ट घोषित केला आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी ८ ते मंगळवार सकाळी ८ वाजेपर्यंत शहर विभागात 46.42, पूर्व उपनगरात 33.02 तर पश्चिम उपनगरात 39.24 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

१०० लोकांचे स्थलांतर
१०० लोकांचे स्थलांतर
author img

By

Published : Aug 31, 2021, 5:41 PM IST

मुंबई - शहरात मंगळवारी आणि बुधवारी पावसाचा यलो अलर्ट घोषित करण्यात आला होता. त्यानुसार मुंबईत सोमवारी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र पावसामुळे मुंबईत काही सखल भाग वगळता कुठेही पाणी साचलेले नाही. यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. मालाड येथे दरड कोसळण्याची भीती असल्याने १०० लोकांना इतर ठिकाणी हलवण्यात आले. तर असल्फा भागात दरड कोसळून ५ ते ६ घरांचे नुकसान झाले आहे असून २ जण जखमी झाले आहेत.

इतका पाऊस पडला
हवामान विभागाने मुंबईत सोमवारी आणि मंगळवारी पावसाचा यलो अलर्ट घोषित केला आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी ८ ते मंगळवार सकाळी ८ वाजेपर्यंत शहर विभागात 46.42, पूर्व उपनगरात 33.02 तर पश्चिम उपनगरात 39.24 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सकाळपासून तीन ते चार तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शहर विभागात 20.82, पूर्व उपनगरात 40.26 तर पश्चिम उपनगरात 39.52 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कांदिवली, बोरिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरीसह अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली, आतापर्यंत या भागात कुठेही पाणी साचलेले नाही. अंधेरी सबवे हा सखल भाग असल्यामुळे अंधेरी सबवे येथे दीड ते दोन फूट पाणी साचल्याने अंधेरी सबवे वाहनांसाठी काही काळ बंद करण्यात आला होता.

मालाड मधील घरे केली रिकामी

मंगळवारी पावसाने पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. जोरदार पाऊस पडत असल्याने पाण्याच्या प्रवाहामुळे आंबेडकर नगर, कुरार व्हिलेज, मालाड येथील डोंगरावरील दगड सरकले. यामुळे त्याखाली असलेल्या घरांना भीती निर्माण झाल्याने १०० रहिवाशांना पारेख नगर येथील महापालिकेच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले.

दरड कोसळल्याने दोघे गंभीर
असल्फा भागात दरड कोसळल्याने ५ ते ६ घरांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहे. घरांवर दरड कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, पालिका अधिकारी आणि फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झाले आणि ढिगारा हटवून अडकलेल्यांना बाहेर काढले. मागील वर्षी डोंगराच्या दोन्ही बाजूंना संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. तिसऱ्या बाजूला डोंगराची उंची जास्त आहे, त्यामुळे तेथे संरक्षक भिंत बांधता आली नाही. पण येत्या अर्थसंकल्पात ती देखील बनवली जाईल. घटनेनंतर, प्रभावित कुटुंबांना जवळच्या शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहेत.
हेही वाचा - hawker attack : बरे होऊन आपले काम सुरूच ठेवणार, कल्पिता पिंपळेंनी व्यक्त केला निर्धार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.