ETV Bharat / city

रेल्वेचे दुसरे 'रेस्टाॅरंट ऑन व्हील' लवकरच एलटीटी स्थानकात; रेल्वेच्या महसुलात होणार वाढ - रेल्वेचे रेस्टाॅरंट ऑन व्हील

मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलसवर सुरु करण्यात आलेल्या रेस्टाॅरंट ऑन व्हील (Restaurant on Wheels )योजनेला पर्यटक आणि मुंबईकरांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता सीएसएमटीनंतर मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर 'रेस्टाॅरंट ऑन व्हील' सुरु करण्याचा तयारी आहे. या रेस्टाॅरंटकरिता रेल्वेने एक कोच सुद्धा तयार केला आहे. हा कोच लवकरच एलटीटी स्थानकात दाखल होणार आहे.

Restaurant on Wheels
Restaurant on Wheels
author img

By

Published : Dec 6, 2021, 6:46 PM IST

मुंबई - मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलसवर सुरु करण्यात आलेल्या रेस्टाॅरंट ऑन व्हील (Restaurant on Wheels ) योजनेला पर्यटक आणि मुंबईकरांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता सीएसएमटीनंतर मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर 'रेस्टाॅरंट ऑन व्हील' सुरु करण्याचा तयारी आहे. या रेस्टाॅरंटकरिता रेल्वेने एक कोच सुद्धा तयार केला आहे. हा कोच लवकरच एलटीटी स्थानकात दाखल होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ईटीव्ही भारतला दिली आहे.

रेल्वे बोगीची रंग-रंगोटी -

मध्य रेल्वेने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या १८ नंबर प्लॅटफॉर्मबाहेर रेस्टॉरंट ऑन व्हील्स (Restaurant on Wheels ) सुरु झाले आहे. हे रेस्टॉरंट वापरातून काढून टाकलेला रेल्वे डब्यात तयार केले आहे. यामध्ये ४० जणांना बसण्याची साेय आहे. येथे प्रवासी, पर्यटकांना व्हेज आणि नान व्हेज दाेन्ही पदार्थांचा आस्वाद घेता येतो. रेस्टाॅरंट ऑन व्हील सुरु झाल्यापासून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यत १० हजार पेक्षा जास्त नागरिकांनी या रेस्टॉरंटमधून खाद्यपदार्थांची चव चाखली आहे. नागरिकांचा प्रतिसाद बघता मध्य रेल्वेने दुसरे रेस्टाॅरंट ऑन व्हील लोकमान्य टिळक टर्मिनसवर सुरु करण्याच्या तयारीत लागली आहे. रेल्वेकडून रेस्टाॅरंटसाठी वापरातून काढून टाकलेल्या रेल्वे डब्याचे रंग-रंगोटीचे काम सुरु केले आहे. लवकरच हा रेल्वेचा कोच लोकमान्य टिळक टर्मिनसवर आण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अशी आली संकल्पना -

मुंबई आणि उपनगरतील रेल्वे स्थानकात खाद्यपदार्थाचे स्टॉल्स असले तरी बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल असे रेस्टॉरंट नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसाेय हाेते. प्रवाशांना रेल्वे हद्दीतच चांगल्या दर्जाचे रेस्टॉरंट व खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिल्यास उत्पन्नही मिळेल, या उद्देशाने भारतीय रेल्वेने 'रेस्टॉरंट ऑन व्हील' ही संकल्पना सुरू केली आहे. मध्य रेल्वेने ही संकल्पना उचलून धरत सीएसएमटी स्थानकात पहिले रेस्टाॅरंट ऑन व्हील सुरु केले आहे. त्याला नागरिकांकडून आणि पर्यटकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे.

निविदा काढण्यात आली -

सीएसएमटी स्थानकांनतर आता एलटीटी स्थानकांत रेस्टॉरंट ऑन व्हील सुरु करण्याचा तयारीत मध्य रेल्वे लागली आहे. येत्या दोन महिन्यात या रेस्टॉरंट ऑन व्हील सुरु करण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे. त्यानंतर मध्य रेल्वे कल्याण, नेरळ, लोणावळा आणि इगतपुरी स्थानकातही रेस्टॉरंट ऑन व्हील संकल्पना राबविण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार या स्थानकात जुन्या काेचचे रुपांतर रेस्टॉरंटमध्ये करण्यात येणार आहे. तसेच मुंबई दर्शनाकरिता येणाऱ्या पर्यटकांना याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. याशिवाय मध्य रेल्वेच्या नागपूर, आकुर्डी, बारामती, चिचवाड आणि मिरज स्थानकात निविदा काढण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.