मुंबई - 'लोग आते है लोग जाते है... सारी दुनिया का बोझ हम उठाते है...’ या ओळींतून ज्यांच्या कष्टाला सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी एक नवीन चेहरा दिला, ते ‘कुली’ ( Railway coolie )अर्थात स्थानकांवरील हमालांचा रोजगार कोरोना काळात जाण्याची वेळ आली होती. विमानतळावर प्रवाशांसाठी ज्या प्रकारच्या सामानवाहू ट्रॉली मिळतात. त्यापद्धतीच्या ट्रॉली सेवा रेल्वे स्थानकांवर सुरु करण्याचा घाट रेल्वेने गेल्या वर्षी घातला होता. याला हमालांनी विरोध केला होता. याबाबाद अनेकदा ईटीव्ही भारतने बातम्या सुद्धा प्रकशित केल्या होता. आता गेल्या एका वर्षाच्या संघर्षानंतर सामानवाहू ट्रॉली कंपनीचं कंत्राट रेल्वेने रद्द ( Railways canceled Private company trolley Proposal ) केलं आहे. याबाबत ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट.
काय होती ट्रॉली सेवा ?
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संक्रमणाचा फटका हा समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना बसला आहे. विशेष करून रेल्वे प्रवाशांच्या सामानाची ने-आण करणाऱ्या रेल्वे हमाल मजुरांवर तर कोरोना काळात दिवस काढणे कठीण होऊन बसले. अशातच विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे स्थानकावर सामान वाहू ट्रॉली सेवा सुरु करण्याचा घाट रेल्वेने घातला होता. मुंबईतील महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर एका खासगी कंपनीचा मदतीने रेल्वे ट्रॉली सेवा सुरु करण्यात येणार होती. याबाबत रेल्वेचे एका खासगी कंपनीबरोबर करार सुद्धा केला होता. मात्र, मुंबईतील रेल्वे हमालांनी याचा विरोध केला. त्यानंतर सुद्धा हमाल मजुरांना खासगी कंपनीने नोकरी देण्याची तयारी दाखवली होती. इतकेच नव्हेतर रेल्वेचा हमाल मजुरांसमोर कंपनीने प्रस्ताव सुद्धा ठेवला होता. यावर चर्चा सुद्धा घेण्यात आली होती.
सुरक्षेचा प्रश्न उपस्थित -
सेंट्रल रेल्वे कॉन्ट्रॅक्ट लेबर संघाचे महामंत्री आणि सीआरएमएसचे प्रवक्ते अमित भटनागर यांनी सांगितले, की मुंबईच्या प्रमुख रेल्वे स्थानकांवरील ट्रॉली सेवा सुरु करण्याचा प्रस्तावाला रेल्वे हमालांनी विरोधा केला. तेव्हा ट्रॉली सेवा सुरु करणाऱ्या कंपनी आणि रेल्वेने या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी रेल्वे हमालांना निमंत्रण देण्यात आले होते. यावेळी रेल्वे हमालांनी आम्हाला सुद्धा चर्चेच्या बैठकीत निमंत्रण दिले. तेव्हा आम्ही ट्रॉली सेवा सुरु करण्याचा प्रस्तावाला विरोध केला होता. मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील गर्दी ही जगजाहीर आहे. या गर्दीत समानवाहू ट्रॉलीवरून प्रवाशांचे किंवा हमालाचे नियंत्रण सुटल्यावर ती ट्रॉली रेल्वे रुळावर येण्याची भीती आहे. याशिवाय या ट्रॉलीला एका पादचारी पुलावरून कसे नेणार हा प्रश्न होता. याबाबत कंपीनीकडे आम्ही प्रश्न विचारल्यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हते. या ट्रॉली सेवामुळे स्थानकांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे, ही बाब आम्ही रेल्वे प्रशासनाच्या लक्ष्यात आणून दिली आहे.
हमाल करी कमाल -
रेल्वेला सर्वाधिक महसूल देणाऱ्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात रेल्वेच्या सर्वाधिक एक्सप्रेस गाड्या ये-जा करत असतात. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस आणि मुंबई सेंट्रल टर्मिनस सारख्या प्रमुख रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांच्या विश्वासावर 550 पेक्षा जास्त हमालांचे कुटुंब जगत आहे. दिवसभरात येणाऱ्या प्रवाशांच्या सामानाची ओझी वाहून येथील हमाल एरवी दिवसाला 500 रुपयांची कमाई करत होते. मात्र, कोरोना संक्रमण असल्यामुळे अगोदरपेक्षा कमी प्रमाणात रेल्वे गाड्या धावत असल्याने सध्या या हमालांच्या कमाईवर परिणाम झाला आहे. त्यात रेल्वेकडून अशा पद्धतीचा ट्रॉली सेवा सुरु करण्याचा प्रस्तावामुळे हमालांचे मोठे नुकसान होणार होते. ही बाब रेल्वेच्या लक्ष्यात आणून दिल्यानंतर आज कंत्राट रद्द केले आहे. हा विजय हमालांचा आहेत, अशी प्रतिक्रिया अमित भटनागर यांनी ईटीव्हीशी बोलताना दिली.
हेही वाचा - कोरोना इफेक्ट; संचारबंदीत हातावर पोट असलेल्या रेल्वे हमालांची उपासमार, व्यक्त केल्या 'या' अपेक्षा