मुंबई - आज मुंबईसह उपनगरातही ( Rain in suburbs including Mumbai ) पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली ( Heavy rain in Mumbai ) असल्याने मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी जमा झाल्याचे दिसत आहे. तसेच मुंबईसहित अनेक भागांमध्ये पाऊस कोसळत असल्याने रेल्वेची लोकल वाहतूक सेवा उशिराने ( Local services in Mumbai disrupted due to rain ) धावत आहे. पश्चिम, मध्य व हार्बर या तिन्ही मार्गावर याचा परिणाम दिसत आहे. मुंबईतील चाकरमान्यांची यामुळे तारांबळ उडाली आहे.
रेल्वे सेवा १० ते २० मिनिटे उशिराने- मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. वास्तविक मुंबईमध्ये आज मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने कालच दिला होता. तसेच दिवसभरामध्ये पावसाचा जोर कायम ( Heavy rain continues in Mumbaib ) राहील अशी शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. जोरात पाऊस सुरू झाला की मुंबईकरांना सर्वात जास्त चिंता असते ती रेल्वेची. सतत जोरात पडणाऱ्या पावसाने नेहमी लोकल रेल्वे सेवेवर ( Local train service affected due to rain ) मोठा परिणाम दिसून येतो. मुंबईतील नोकरदारांचे मोठे हाल याने होतात. आजही सतत पाऊस पडत असल्याने रेल्वेवर याचा प्रभाव दिसून आला असून पश्चिम, मध्य व हार्बर रेल्वे १० ते २०मिनटे रेल्वेसेवा उशिराने धावत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील ४८ तास मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यताही वर्तवली गेली आहे. जर अशाच पद्धतीने पाऊस सुरू राहिल्यास रेल्वे पाठोपाठ रस्ते वाहतुकीवर सुद्धा याचा मोठा परिणाम दिसून येईल.
परतीच्या पावसाची शक्यता? अरबी सुद्रातून बाष्पाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झाल्याने मागील आठवड्यातही राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला होता. कमी दाबाचा पट्टा सध्या गुजरातवरुन महाराष्ट्राच्या दिशेने म्हणजेच दक्षिणेकडे मूळ जागेवर सरकत असल्याने मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याचं सांगितलं जात आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये जोरदार सरी कोसळल्या होत्या. सध्या जोरदार पावसासाठी पोषक असणारी स्थिती आता क्षीण होत असल्याने हा यंदाच्या मौसमातील पावसाचा शेवटचा जोर असेल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.