ETV Bharat / city

Rahul Narvekar Assembly Speaker : विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड, सर्वात तरुण अध्यक्ष - भारतीय जनता पार्टी

विधानसभा अध्यपदाची निवडणूक ही विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी झाली यात शिंदे गट आणि भाजपकडून राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar ) यांची निवड झाली आहे (Rahul Narvekar new assembly speaker) त्यांना 164 मते मिळाली तर शिवसेनेचे राजन साळवी ( Rajan Salvi ) यांना 107 मते मिळाली. तर 3 आमदार मतदान प्रक्रियेत तटस्थ भुमिका घेतली.

Narvekar new assembly speaker
नार्वेकर नवे विधानसभा अध्यक्ष
author img

By

Published : Jul 3, 2022, 12:34 PM IST

Updated : Jul 3, 2022, 4:01 PM IST

मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी त्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यपालांनी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलाविले ते आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान ( Maharashtra Assembly Speaker election ) प्रक्रिया पार पडली. यात नर्वेकर यांचा विजय झाला.

बहुमतापेक्षा जास्त मते: महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या राहुल नार्वेकरांची यांची निवड झाली. गदारोळात हे मतदान पार पडले. भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार नार्वेकर यांना 164 मत मिळाले. नार्वेकरांना बहुमतापेक्षा जास्त मते मिळाली आहेत. नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करावी असा प्रस्ताव भाजपाकडून मांडला. महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांचा प्रस्ताव मांडला. यात नार्वेकर विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना 107 मते मिळाली. तर तीन आमदारांनी तटस्थतेची भुमिका घेतली.

शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक : भारतीय जनता पार्टीच्या ( BJP ) वतीने राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar ) यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या ( Assembly Speaker election 2022 ) निवडणुकीसाठी अर्ज भरला. त्यांना उभे करून भाजपने शिवसेनेला कात्रीत पकडले. कारण नार्वेकर हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. शिवसेना नंतर राष्ट्रवादी आणि त्यानंतर भाजपा असा त्यांचा प्रवास राहिला आहे. त्यामुळे ही निवडणूक तशी एक शिवसैनिक विरुद्ध दुसरा शिवसैनिक अशीच झाली.

तटस्थ आणि अनुपस्थित आमदार: निवडणुकीत समाजवादी पक्षाचे रईस शेख आणि अबू आजमी हे दोन आमदार तर एम आय एम चे शाह अन्वर आमदार तटस्थ राहिले. भारतीय जनता पक्षाचे मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे दोन आजारी आमदार अनुपस्थित राहिले. एम आय एम चा एक आमदार इस्माईल हे अनुपस्थित राहिले. दत्तात्रय भरणे, निलेश लंके, दिलीप मोहिते पाटील, बबन शिंदे, अण्णा बनसोडे हे अनुपस्थित राहिले तर काँग्रेसचे प्रणिती शिंदे रणजीत कांबळे आमदार अनुपस्थित राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मधील आणि अनिल देशमुख यांना मतदान करता आले नाही तर अध्यक्षस्थानी असलेल्या नरहरी झिरवळ यांनाही मतदान करता आले नाही. एकूण २८६ आमदारांपैकी १७४ आमदारांचे मतदान झाले तर बारा आमदार अनुपस्थित राहिले.

राज्यपालांची भूमिका: राज्यपालांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगत विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलाविले. आज प्रथम अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडीवर सर्वप्रथम काँग्रेसने आक्षेप घेतला. जानेवारी २०२१ रोजी काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते. काँग्रसने आक्रमक पवित्रा घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लक्ष्य केले. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात काॅंग्रेसने तीन वेळा राज्यपालांची भेट घेत निवडणूक घेण्याची मागणी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयातील याचिकेचे कारण देत त्यांनी ही परवानगी नकारली होती.

निवडणूक का नव्हती झाली : राजभवनाकडून विधानसभा अध्यक्षाच्या निवडीबाबत महाविकास आघाडीला पत्र पाठविण्यात आले होते. या पत्रात म्हटले होते की, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने, विधानसभा अध्यक्ष निवडीची तारीख निश्चित करता येणार नाही. तेव्हापासून अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा विषय अडलेला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेचे कारण देत त्यांनी ही परवानगी नाकारली होती. आता मात्र ही निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

व्हिपचा वाद : एखाद्या पक्षाने कोणत्या मुद्द्यावर सभागृहामध्ये भूमिका घ्यायची याबद्दल घेतलेला निर्णय म्हणजेच व्हिप होय. संसदीय लोकशाहीत पक्षातर्फे प्रतिनिधिंना व्हिप जारी केला जातो. पक्षाचा आदेश सर्व आमदारांना बंधनकारक असतो. हा व्हीप राजकीय पक्षाचा अधिकार असतो. विधिमंडळात आमदारांना पक्षादेश पाळणे हाच व्हीपचा मुख्य हेतू असतो. पक्षाच्या सर्व आमदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पक्ष असे वेळेवेळी व्हीप जारी करतात.एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी शिवसेनेचा व्हिप पाळला नाही.

बंडखोरांची जाऊ शकते आमदारकी: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली आहे. त्याजागी अजय चौधरी यांची गटनेते म्हणून नियुक्ती केली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदारांना व्हीप जारी केला. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच मतदान करण्याचे आदेश देण्यात आले होते. तर, शिंदे यांनी आम्हाला व्हीप मान्य नाही, असं म्हटले होते. त्यावर कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी व्हीपनुसार शिवसेनेच्या बंडखोरांनी मतदान केले नाही तर त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते मत व्यक्त केले आहे.

हेही वाचा : Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष झालेल्या राहुल नार्वेकरांचा राजकीय प्रवास...

Last Updated : Jul 3, 2022, 4:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.