मुंबई - शीना बोरा हत्याकांड प्रकरणात राहुल मुखर्जीचा मुंबई सत्र न्यायालयात Bombay Sessions Court आज पुन्हा इंद्राणी मुखर्जीचे वकील रणजीत सांगळे त्यांच्या वतीने उलट तपासणी घेण्यात येणार होती. मात्र इंद्राणी यांचे वकील काही कारणास्तव आज कोर्टात उपस्थित राहू शकले नसल्याने पुढील आठवड्यात सोमवारी उलट तपासणी पुन्हा घेण्यात येणार आहे. या आठवड्यात सुरू असलेल्या उलट तपासणीत राहुल मुखर्जी याने विविध स्वतः संदर्भातील अनेक राज उलगडले होते.
राहुल मुखर्जीचा दावा - मुंबईतील हाय प्रोफाईल शीना बोरा हत्याकांडातील प्रकरणामधील प्रमुख साक्षीदार राहुल मुखर्जीची तीन आणि चार ऑक्टोंबर रोजी इंद्राणीचे वकील यांच्यावतीने उलट तपासणी करण्यात आली होती. या तपासणी दरम्यान राहुल मुखर्जी याने कबूल केले होते, की शीना बोरा सोबत त्याचे लग्न झाले नव्हते. तसेच एंगेजमेंट देखील झालेली नव्हती. मात्र भाड्याने राहण्याकरिता त्याला एक प्लॉट आवश्यक असल्याने त्याने शीना बोरा सोबत लग्न युकेमध्ये झाला आहे, असे खोटे डॉक्युमेंट घराचे एग्रीमेंट करत्यावेळी देण्यात आले होते. हे सर्व डॉक्युमेंट शीना बोराने आणले होते, असा देखील दावा राहुल मुखर्जीने केला होता.
उलट तपासणी पुढील आठवड्यात - आज देखील राहुल मुखर्जी यांच्या विरोधात इंद्राणी मुखर्जीच्या वतीने काही वेगळे खुलासे करण्याची शक्यता उलट तपासणी दरम्यान वर्तवण्यात आले होते. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचच लक्ष लागलं होतं. मात्र इंद्राणी मुखर्जी यांचे वकील आज आले नसल्याने आता या प्रकरणात राहुल मुखर्जी यांची उलट तपासणी पुढील आठवड्यात होणार आहे. त्यावेळी काय नवीन खुलासे इंद्राणीच्या वकिलांच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल मुखर्जी करतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
काय आहे प्रकरण - इंद्राणी मुखर्जीने एकूण तीन लग्न केली आहेत. ज्यात प्रथम तिला पतीपासून मुलगी झाली. तिचं नाव शीना बोरा होतं. इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी हा इंद्राणी मुखर्जीचा मुलगा आणि शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितलं जातं. इंद्राणी आणि पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली होती. शेजारच्या रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर इंद्राणी शिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली होती. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. तपासानुसार शीनाच्या राहुल सोबतच्या संबंधांना इंद्राणीचा विरोध होता. याशिवाय आर्थिकवाद हा हत्येमागील संभाव्य कारण होतं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात बंद आहे.