मुंबई - शहरात सध्या निता अंबानी आणि मुकेश अंबानी यांची होणारी सून राधिका मर्चंट ( Bharatnatyam by Radhika ) हिची जोरदार चर्चा आहे. राधिकाने केलेल्या भरतनाट्यमने सर्वांना मोहित केले आहे. या नृत्य कार्यक्रमाला अंबानी कुटुंबासह ( Radhika Merchant Bharatnatyam Mumbai ) राधिका यांचे कुटुंबही उपस्थित होते. यावेळी दोन्ही कुटुंबांनी ( Ambani family saw Radhika Merchant Bharatnatyam ) राधिकाचा उत्साह वाढवला. राधिका यांनी अरंगेत्रम सोहळ्यात एकटे नृत्य केले होते. सुंदर पोशाख घातलेल्या राधिकाने संगिताच्या तालावर थिरकत चेहऱ्यावरील हावाभावांनी सर्वांना मोहून टाकले होते. रविवारी बीकेसी येथे जिओ वर्ल्ड सेंटरमधील ग्रँड थिएटरमध्ये हा सोहळा पार पडला. राधिका हिचे निता आणि मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत याच्याशी लग्न होणार आहे.
हेही वाचा - Karan Johar Party : करण जोहरची पार्टी ठरली कोरोनाची सुपर स्प्रेडर
या सोहळ्याला सार्वजनिक सेवा, कला आणि व्यापार या क्षेत्रांतील लोकांची उपस्थिती होती. हे सर्व अंबानी यांच्या होणाऱ्या सुनेचे नृत्य पाहण्यासाठी उत्सुक्त होते. बहुतेक उपस्थितांनी कार्यक्रमाला साजेसा असा पारंपरिक पोशाख परिधान केला होता. ब्रोकाडेड, एम्ब्रॉयडरी सिल्क साड्या, शेरवानी आणि कुर्त्यासह उपस्थित पाहुण्यांनी कार्यक्रमाची भव्यता वाढवली होती. अंबानी आणि मर्चंट कुटुंबाने मनापासून पाहुण्यांचे स्वागत केले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले गेले.
सोहळ्यात राधिकाने दमदार नृत्यू करून सर्वांना मंत्रमुग्ध केले होते. अरंगेत्रमसाठी राधिकाने तिची गुरू भावना यांच्यासह आठ वर्षे मेहनत घेतली होती. त्यानंतर काल त्यांच्या मेहनतीचे चीज झाले. अरंगेत्रममध्ये भारतीय शास्त्रीय नृत्य आणि संगित कलेची आवड असणाऱ्याचे पदार्पण होते. अरंगेत्रम हा एक असा क्षण आहे जेव्हा एक शास्त्रीय नृत्यांगना प्रथमच रंगमंचावर नृत्य सादर करते. ती त्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे आणि नृत्याच्या प्रकारात शिकलेल्या सर्व गोष्टींचे प्रदर्शन करते.
विशेष म्हणजे, अंबानी कुटुंबात होणाऱ्या सासू निता यांच्या नंतर राधिका या भरतनाट्यम शिकलेल्या दुसरी व्यक्ती ठरणार आहेत. निता या प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. प्रचंड राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या असूनही निता भरतनाट्यम करतात. राधिकाच्या परफॉर्मन्समध्ये अरंगेत्रमच्या सर्व पारंपारिक घटकांचा समावेश होता. पुष्पांजलीपासून नृत्याचा प्रारंभ झाला. गुरूचा, देवाचा आणि नृत्य रसिकांचा आशीर्वाद यातून अपेक्षित होता. त्यानंतर लगेच गणेश वंदना आणि नंतर पारंपरिक अलारिपू हा नृत्यू प्रयोग झाला.
पुष्पांजलीपासून सुरुवात करून मंचावरील देवता, देव, गुरू आणि श्रोत्यांना त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आमंत्रण दिले आणि त्यानंतर लगेचच गणेश वंदना आणि पारंपारिक अलारिपू नृत्याला सुरुवात झाली. अलारिप्पू हा पारंपारिकपणे पहिला नृत्य भाग आहे जो भरतनाट्यम नर्तक या प्रकारच्या शास्त्रीय नृत्यात शिकतात आणि सादर करतात. यानंतर रागामालिकावर बसवलेले लोकप्रिय भजन ‘अच्युतम केशवम’, शिव पंचाक्षराचे शक्तिशाली सादरीकरण झाले आणि भगवान नटराजच्या शाश्वत नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर राधिकाने गुंतागुंतीचा ‘अस्तरासा’ किंवा नाट्यशास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे माणसाच्या जन्मजात आठ मूलभूत भावना सादर केल्या. यामध्ये शृंगार (प्रेम), हास्य, करुणा (दुःख), भय, वीरा (वीरता), रौद्र (क्रोध), बिभीत्सा (तिरस्कार) आणि अद्भूत (आश्चर्य) यांचा समावेश होतो. राधिकाच्या अभिव्यक्तीसह विविध नृत्य मुद्रांद्वारे भावना व्यक्त करण्याची क्षमता पाहून प्रेक्षक प्रभावित झाले होते.
हेही वाचा - Salman Khan : सलमान खान आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी