ETV Bharat / city

धक्कादायक : मुंबईत माथेफिरुचा 3 पोलिसांवर चॉपरने हल्ला, पाहा व्हिडिओ - chopper attack

शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास मरीन ड्राइव्ह परिसरात नाकाबंदी दरम्यान 2 पोलीस अधिकारी आणि 1 पोलीस कॉन्स्टेबलवर एका माथेफिरुने चॉपरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

mumbai police
मुंबईत पोलिसांवर हल्ला
author img

By

Published : May 9, 2020, 12:46 PM IST

Updated : May 9, 2020, 2:36 PM IST

मुंबई - लॉकडाऊन दरम्यान पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास मरीन ड्राइव्ह परिसरात नाकाबंदी दरम्यान 2 पोलीस अधिकारी आणि 1 पोलीस कॉन्स्टेबलवर एका माथेफिरुने चॉपरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील ब्रीच कॅण्डी परिसरात सिल्व्हर ओक इस्टेट येथे राहणाऱ्या करण प्रदीप नायर (27) या युवकाने पोलिसांवर हल्ला केला आहे.

मरीन ड्राइव्ह परिसरात नाकाबंदी दरम्यान पोलिसांवर हल्ला...

हेही वाचा... धक्कादायक..! उल्हासनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्णालाच शासकीय रुग्णालयातून डिस्चार्ज

पोलिसांच्या खांद्यावर आणि हातावर चॉपरने वार झाल्याने तीनही पोलीस जखमी झाले. जखमी पोलिसांना जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच माथेफिरू आरोपीला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री दीडच्या दरम्यान पोलिसांना करण प्रदीप नायर हा आरोपी हातात मोठा चॉपर घेऊन जात असताना आढळला. पोलिसांनी त्यास अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडले असता आरोपीने पोलिसांवर चॉपरने हल्ला केला. आर्किटेक्चर असलेल्या करण प्रदीप नायरला पोलिसांनी अटक केली आहे.

Last Updated : May 9, 2020, 2:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.