ETV Bharat / city

धारावीकरांसाठी उभारले जात आहे चार हजार खाटांचे विलगीकरण कक्ष..! - धारावी विलगीकरण कक्ष

यामध्ये माहिम निसर्गोद्यान समोरील ३५ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या भूखंडावर २०० खाटांच्या जम्बो फॅसिलीटीचाही समावेश आहे. या जम्बो फॅसिलीटीमध्ये प्रत्येक खाटेवर ऑक्सिजन पुरवठ्याची (व्हेंटिलेटर) सोय असेल. सीसीसी-१ आणि सीसीसी-२ मिळून एकूण ४ हजार ४०७ खाटा विलगीकरणासाठी उपलब्ध होणार आहेत.

Quarantine centers with around four thousand beds to be set up in Dharavi
धारावीकरांसाठी उभारले जात आहे चार हजार खाटांचे विलगीकरण कक्ष..!
author img

By

Published : May 24, 2020, 10:08 PM IST

मुंबई - कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत कोरोनाच्या रुग्णांना विलगीकरणात ठेवता यावे म्हणून ३,७४० खाटांचे 'कोरोना केअर सेंटर' उभारले जात आहे. यासोबतच, माहीम निसर्गोपचार केंद्राच्या जागेवरही २०० खाटांचे विलगीकरण कक्ष उभारले जात आहे. यामुळे धारावीत एकूण ४,४०७ खाटांची क्षमता असलेले विलगीकरण कक्ष उपलब्ध होणार आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज या कामाची पाहणी केली.

मुंबईत हॉटस्पॉट असलेल्या धारावीत कोरोनाचे १,५४१ रुग्ण आहेत. धारावीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून कोरोना केअर सेंटर २ (सीसीसी-२) अंतर्गत ६६७ खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या विभागामध्ये 'कोरोना केअर सेंटर १' (सीसीसी-१) अंतर्गत ३ हजार ७४० खाटांच्या क्षमतेची व्यवस्था करण्यात येत आहे. यामध्ये माहिम निसर्गोद्यान समोरील ३५ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या भूखंडावर २०० खाटांच्या जम्बो फॅसिलीटीचाही समावेश आहे. या जम्बो फॅसिलीटीमध्ये प्रत्येक खाटेवर ऑक्सिजन पुरवठ्याची (व्हेंटिलेटर) सोय असेल. सीसीसी-१ आणि सीसीसी-२ मिळून एकूण ४ हजार ४०७ खाटा क्वारेंटाईनसाठी उपलब्ध होणार आहेत. यामुळे धारावीमधील जास्तीत जास्त नागरिकांना विलगीकरणात ठेवता येणे शक्य होणार आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी विलगीकरण सुविधेसाठी नव्याने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी केली. यावेळी त्यांनी अँथनी डिसिल्वा स्कूल, भारत स्काऊटस्‌ ॲण्ड गाइडस्‌ सभागृह, माहिम निसर्गोद्यान, राजीव गांधी क्रीडा संकुल यासह विविध ठिकाणी केलेल्या व्यवस्थेचीही पाहणी केली. तसेच, विलगीकरणात वास्तव्यास असलेल्या नागरिकांची विचारपूस करतानाच त्यांना मिळणारे जेवण, इतर सुविधा यांचे निरीक्षणदेखील केले. रुग्णवाहिका उपलब्धता, रुग्णांची ने-आण, प्रतिबंधात्मक क्षेत्रातील उपाययोजना, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता याबाबत निर्देशदेखील दिले. महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी धारावी परिसरात काही दिवसांपूर्वी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी संस्थात्मक विलगीकरण करण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार या सुविधा निर्माण केल्या जात आहेत.

हेही वाचा : चिंताजनक..! राज्यात एकाच दिवसात 3 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण सापडले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.