ETV Bharat / city

नारायण राणेंनी अभिवादन केल्यानंतर शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन राणे यांनी अभिवादन केले. परंतु, राणे यांनी स्मृतीस्थळावर जाण्यास शिवसेना कार्यकर्त्यांसह, नेत्यांचाही विरोध होता. मात्र, सकाळी हा विरोध काहीसा शमला आणि राणे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन करण्यासाठी गेले. मात्र, याला शिवसैनिकांचा विरोध असल्याने राणे वंदन करून आल्यानंतर शिवसैनिकांनी स्मृतीस्थळाचे दुधाने अभिषेक घालत शुद्धीकरण केले आहे.

राणेंच्या अभिवादनानंतर शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण

author img

By

Published : Aug 19, 2021, 8:15 PM IST

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आज मुंबईतून सुरू झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन राणे यांनी अभिवादन केले. परंतु, राणे यांनी स्मृतीस्थळावर जाण्यास शिवसेना कार्यकर्त्यांसह, नेत्यांचाही विरोध होता. मात्र, सकाळी हा विरोध काहीसा शमला आणि राणे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन करण्यासाठी गेले. मात्र, याला शिवसैनिकांचा विरोध असल्याने राणे वंदन करून आल्यानंतर शिवसैनिकांनी स्मृतीस्थळाचे दुधाने अभिषेक घालत शुद्धीकरण केले आहे.

राणेंच्या अभिवादनानंतर शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण
'शिवसेना सोडून गेल्यानंतर इतक्या वर्षात त्यांना बाळासाहेब दिसले नाहीत'

स्मृतीस्थळाची पाहणी करणारे आप्पा पाटील यांनी दुधाने अभिषेक घातला. त्यानंतर गोमूत्राने हे शुद्धीकरण केले आहे. राणे या ठिकाणी सकाळी आले होते, त्यानंतर हे शुद्धीकरण केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पाटील यांच्यासोबत काही शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते हजर होते. आज ही वस्तू अपवित्र झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी दुग्धाभिषेक केलेला आहे असही शिवसैनिकानी सांगितले आहे. शिवसेना सोडून गेल्यानंतर राणे यांना इतक्या वर्षात बाळासाहेब दिसले नव्हते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काहीही बोलतात. आम्ही ठाकरे कुटुंबाबद्दल निष्ठा राखणारे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्ही हे सहन करू शकत नाही. म्हणून आम्ही हे शुद्धीकरण केले आहे, असही पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - भाजप जन आशीर्वाद यात्रा, मंत्री नारायण राणे करणार बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला अभिवादन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.