ETV Bharat / city

PIL Against Rupali Chakankar : रूपाली चाकणकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका - रुपाली चाकणकर ताज्या बातम्या

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राष्ट्रावादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai Highcourt ) याचिका दाखल करण्यात आली आहे. चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग राजकीय लढाईत करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. इंडियन बार असोसिएशन ( Indian Bar Association ) तर्फे ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

PIL Against Rupali Chakankar
PIL Against Rupali Chakankar
author img

By

Published : Apr 30, 2022, 3:55 PM IST

Updated : Apr 30, 2022, 9:51 PM IST

मुंबई - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांच्याविरोधात शनिवारी मुंबई उच्च न्यायालयात इंडियन बार असोसिएशन ( Indian Bar Association ) तर्फे जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या पदाचा दुरूपयोग राजकीय लढाईत करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्यात यावी, याकरिता सोमवारी लेखी अर्ज करण्यात येणार आहे.

इंडियन बार असोसिएशनतर्फे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत भाजपा नेते नारायण राणे आणि गणेश नाईक यांच्याविरोधात पदाचा गैरवापर करत आदेश दिल्याचा दावा इंडियन बार असोसिएशनतर्फे करण्यात आला आहे. चाकणकरांविरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश देण्याची याचिकेत मागणी करण्यात आली आहे. भाजपा नेते नारायण राणे यांच्याविरोधात अलिकडेच काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तर दुसरीकडे गणेश नाईक यांच्यासंबंधी एका महिलेने तक्रार दाखल केली होती. मात्र, या प्रकरणांमध्ये राजकीय हेतूने चाकणकर कारवाई करत असल्याचा आरोप होत आहे.

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 11 मंत्र्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या पदाचा दुरुपयोग आपल्या पार्टी विरोधातील इतर पार्टी मधील नेत्यांविरोधात केला आहे. आता राज्य सरकार कडून आणि महिला आयोगाकडून या याचिकेला काय उत्तर देण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात राज्याच्या महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

'रुपाली चाकणकर यांच्या कडून पदाचा दुरुपयोग' - महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अर्ध न्याय पदावर असताना पक्षाचे कामकाज करणे हे चुकीचे आहे. तसेच नवाब मलिक यांना कोर्टाने न्यायालय कोठडी पाठवल्यानंतर पार्टीच्या आंदोलनात सहभागी होणे महिला आयोगाच्या कलम 20 नुसार चुकीचे आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात आयपीसी 409 नुसार गुन्हे तसेच त्यांच्यासोबत त्यावेळी उपस्थित असलेले आमदार, खासदार, मंत्री यांच्या विरोधात देखील IPC 120B नुसार गुन्हेगार असतात असे कायद्यात म्‍हटले आहे. त्यामुळे रूपाली चाकणकर यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती याचिकाकर्ते निलेश ओझा यांनी दिली आहे.

हेही वाचा - Raj Thackeray Aurangabad Rally : महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये धडाडणार राज ठाकरेंची तोफ, सभेसाठी जय्यत तयारी

Last Updated : Apr 30, 2022, 9:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.