मुंबई - केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेची कोणतीही भाडेवाढ न करुन प्रवाशांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. मुंबई उपनगरीय मार्गासाठी कोणतीही नवीन घोषणा करण्यात आली नाही. मात्र, मुंबई उपनगरीय मार्गावर घेण्यात आलेल्या प्रलंबित एमयूटीपी ३ ए प्रकल्पाला पूर्ण करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबईकरांसाठी फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात एमयूटीपी २, ३ आणि ३ ए साठी ५७८ कोटी रुपयांची किरकोळ तरतूद केली होती. यात एमयूटीपी ३ ए साठी फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, आता या प्रकल्पांसाठी मुंबईच्या वाट्याला किती कोटी रुपये आले हे १० जुलैला स्पष्ट होणार आहे.
आज उपनगरीय रेल्वेत गुंतवणूक करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तर रेल्वेची सेवा गतिमान करण्यासाठी पीपी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेमुळे खासगी गुंतवणूकदार रेल्वेत सहभागी होणार आहेत. अर्थसंकल्पात रेल्वे प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. या अर्थसंकल्पाचे प्रवासी संघटनांनी स्वागत केले आहे.
एमयूटीपी 3 ए अंतर्गत करण्यात येणारे प्रकल्प
- एसी लोकल
- बोरिवली ते विरार पाचवा सहावा मार्ग
- कल्याण ते आसनगाव चौथा मार्ग
- कल्याण ते बदलापूर तिसरा, चौथा मार्ग