ETV Bharat / city

#CAA आणि #NRC बाबत राज्यभरात निषेध आणि समर्थन मोर्चांचे आयोजन - support marches in state against CAA and NRC

नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (NRC) वरून देशभरात वातावरण पेटलेले पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये मागील काही दिवसांपासून या कायद्यांबाबत निषेध आणि समर्थन करणाऱ्या मोर्चांचे आयोजन करण्यात आले.

protest and support marches throughout the state against CAA and NRC
CAA आणि NRC बाबत राज्यभरात निषेध आणि समर्थन मोर्चांचे आयोजन
author img

By

Published : Dec 25, 2019, 2:41 PM IST

मुंबई - नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (NRC) ला देशात काही ठिकाणी विरोध तर काही ठिकाणी समर्थन मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रातही या कायद्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक शहरात मागील काही दिवसांपासून या कायद्याच्या विरोधात तर काही ठिकाणी समर्थनार्थ मोर्चे काढण्यात आले. मुंबई, सांगोला, पालघर, उस्मनाबाद, हिंगोली, नांदेड, अर्धापूर, अकोला, चंद्रपूर, यवतमाळ, रायगड, ठाणे, पुणे, जळगाव, नाशिक, पिंपरी-चिंचवड, येवला आदी ठिकाणी मोर्चे काढण्यात आले.

हेही वाचा...एनआरसीबाबत पंतप्रधान मोदी देशाशी खोटं बोलले; त्यांचा निषेध करावा तेवढा कमीच

सांगोला येथे नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसी विरोधात मोर्चा

सांगोला येथे नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीला विरोध करण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सांगोल्यातील कडलास नाका येथून या भव्य मोर्चाची सुरुवात करण्यात आली. मोर्चामध्ये सहभागी असणाऱ्या अनेकांच्या हातात यावेळी काळे झेंडे होते, तर काहीजण तिरंगा झेंडा हातात घेवून घोषणा देत मोर्चात सहभागी झाले होते.

मुंबई आयआयटीत सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनात रॅली

देशात सुधारित नागरिकत्व कायद्याला विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी विरोध केला. त्यामुळे देशभर या कायद्याच्या विरोधात वातावरण उभे राहिलेले दिसत असतानात, मुंबईतील आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी या कायद्याच्या समर्थनार्थ कॅम्पसमध्ये समर्थन रॅली काढली.

पालघरमध्ये नागरिकत्व कायद्याविरोधात मोर्चा

केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) कायद्याविरोधात पालघरमध्ये बहुजन समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. पालघर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालय, असे या मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ उस्मानाबादमध्ये मोर्चा

नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देत, जनजागृती करण्यासाठी उस्मानाबाद शहरात मोर्चा काढण्यात आला. अनेक संघटनांनी या कायद्याचा विरोधात धरणे आंदोलन केले. मात्र, पालघरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रसेविका समिती, किसान संघ, मजदूर संघ, भटके-विमुक्त विकास परिषद, शिवराज्याभिषेक सोहळा समिती, भारत माता मंदिर प्रकल्प यांच्यासह 45 सामाजिक संस्था संघटनांनी एकत्र येऊन रॅली काढली होती.

हेही वाचा... भाजप छी छी..! ममतांनी दिल्या भाजपसह सीएए, एनआरसी विरोधात घोषणा

हिंगोली येथे नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मोर्चा निघाला. मात्र, हिंगोलीत पहिल्यांदाच नागरिकत्व कायद्याच्या समर्थनात मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे या मोर्चामध्ये 151 फूट तिरंगा झेंड्याची रॅली काढण्यात आली. बहुसंख्य नागरिकांनी रस्त्यावर येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

अर्धापूरमध्ये नागरिकता संशोधन विधेयकाच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा

केंद्र सरकारने नागरिकता संशोधन विधेयक पारीत केल्यावर काही राज्यात या कायद्याला विरोध करत मोर्चे काढण्यात आले. मात्र, हे विधेयक भारतीय नागरिकांच्या विरोधात नसून परदेशातून आलेल्या घूसखोरांना प्रतिबंध घालण्यासाठी असल्याचे सांगत, या विधेयकाच्या समर्थनार्थ नांदेडमधील अर्धापूर येथे सोमवार 23 डिसेंबर रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला.

अकोल्यात महासभेद्वारे एनआरसीला विरोध

अकोल्यात एका विशाल सभेद्वारे NRC आणि CAA कायद्याला विरोध दर्शवण्यात आला आहे. अकोला क्रिकेट क्लब येथे तहफुज-ए-कानून-ए-शरियत समितीतर्फे या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

नागरिकता कायद्याविरोधात मुस्लीम समाजाचा निषेध मोर्चा

चंद्रपूरमधील गडचांदूर येथे नागरिकता कायद्याच्या विरोधात मुस्लीम समाजाने निषेध मोर्चा काढला. केंद्र शासने मंजूर केलेले नागरिक संशोधन विधेयक रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी गडचांदूर येथील मुस्लीम समाजाच्या वतीने या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

हेही वाचा...'शिवभोजन' थाळीचं ठरलं; १० रुपयात मिळणार 'हे' पदार्थ

नागरिकत्व दुरुस्ती कायदा लवकरात लवकर लागू करा ABVP मागणी

उस्मानाबाद जिल्ह्यात नागरिकत्व दुरूस्ती कायदा महाराष्ट्रात लवकरात लवकर लागू करण्यात यावा, यासाठी एबीव्हीपीकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. अनेक राज्यांकडून या कायद्याची अंमलबजावणी करण्यास नकार दर्शवण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्रात हा कायदा लवकरात लवकर लागू करावा, अशी मागणी ABVP संघटनेच्या वतीने करण्यात आली.

सीएबी व एनआरसी विरोधात उमरखेडमध्ये धरणे आंदोलन

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे, केंद्र शासनाने पारित केलेल्या नागरिकता दुरूस्ती कायद्याच्या विरोधात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. उपविभागीय कार्यालय प्रांगणात हे आंदोलन करण्यात आले.

एनआरसी आणि कॅब विरोधात रायगडमध्ये बहुजन मुक्ती मोर्चाकडून निदर्शने

एनआरसी आणि नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात रायगडमध्ये बहुजन मुक्ती मोर्चाकडून निदर्शने करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये हे विरोध प्रदर्शन करण्यात आले.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात नांदेडमध्ये निदर्शने

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आयोजित धरणे आंदोलनाला नांदेडमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रचंड संख्येने जमलेल्या आंदोलनकर्त्यांच्या घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. हा कायदा अन्यायकारक असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.

हेही वाचा.. 'ख्रिस्ताची शिकवण ही जगभरातील करोडो लोकांना प्रेरणा देते'

NRC आणि CAA विरोधात ठाण्यातील मुस्लीम समाजाची शांतीपूर्ण निदर्शने

NRC आणि CAA वरून देशातील अनेक भागात नाराजी असताना, ठाण्यातही याची सुरुवात झाल्याचे दिसत आहे. ठाण्यातील राबोडी येथील ऐतिहासिक जामा मशिदीजवळ हजारो मुस्लीम बांधवांनी एकत्र येत सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात निदर्शने केली.

सीएए आणि एनआरसी विरोधात पुण्यात मुस्लिम समाजाचा मोर्चा

देशातील अनेक भागात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि नागरिकत्व संशोधन विधेयकाविरोधात आंदोलने सुरू आहेत. पुण्यातही मुस्लीम समाजाकडून या कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

नागरिकत्त्व संशोधन कायद्याविरोधात जळगावात धरणे आंदोलन

केंद्र सरकारने नागरिकत्व संशोधन कायदा त्वरित मागे घ्यावा, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी जळगावात विविध मुस्लीम संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.

कॅब, एनआरसी विरोधात मालाडमध्ये विविध सामाजिक संघटनांची निदर्शने

नागरिकत्व सुधारित कायदा (CAB) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) विरोधात मुंबई पश्चिम उपनगरातील मालाड, मालवणी लालजीपाडा या भागातील विविध सामाजिक संघटनांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. हा कायदा रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हेही वाचा...VIDEO: जाणून घ्या 2019 मधील सर्वात मोठ्या राजकीय घडामोडी...

नाशिकमध्ये सीएए'च्या समर्थनार्थ ABVP कडून समर्थन मोर्चा

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून समर्थन मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. 'We Support CAA' अशा मजकूराचे फलक हातात घेत भोसला मिलिटरी स्कूलच्या गेटपासून व्ही. एन. नाईक कॉलेजपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

पिंपरी-चिंचवडमध्ये मुस्लिम बांधवांचा एनआरसी आणि सीएए विरोधात मोर्चा

देशातील अनेक भागात एनआरसी आणि सीएएच्या विरोधात मोर्चा काढले जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात देखील 'कूल जमाआती तंझिम' या संघटनेच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

NRC विरोधात बहुजन क्रांती मोर्चाचे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

एनआरसी अस्तित्वात आल्याने मुस्लीम समाजच नव्हे तर अनुसूचित जाती जमातीवर देखील अन्याय होत आहे. त्यामुळे हा कायदा मुस्लीम विरोधी नाही तर बहुजन विरोधी असल्याचा आरोप बहुजन क्रांती मोर्चाने केला आहे. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात उस्मानाबादमधील व्यापारी वर्ग उतरला रस्त्यावर

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी उस्मानाबाद शहरातील व्यापारीही सहभागी झाले आहेत. शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शवला. तसेच जिल्ह्यातील विविध विद्यार्थी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.

येवल्यात नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनात मोर्चा

नाशिकमधील येवल्यात नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनात मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजप, शिवसेना व शहरातील अनेक नागरिकांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

हेही वाचा... सिंचन घोटाळा प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे घुमजाव

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.