ETV Bharat / city

#CAA आणि #NRC विरोधात राज्यभर निषेध आणि समर्थन मोर्चांचे आयोजन - support marches in state against CAA and NRC

नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (NRC) वरून देशभरात वातावरण पेटलेले पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये या कायद्याच्या विरोधात निषेध मोर्चांचे तर काही ठिकाणी कायद्याच्या समर्थनार्थ समर्थन मोर्चांचे आयोजन करण्यात आले.

protest and support marches throughout the state against CAA and NRC
CAA आणि NRC विरोधात राज्यभर निषेध आणि समर्थन मोर्चांचे आयोजन
author img

By

Published : Dec 24, 2019, 12:32 PM IST

Updated : Dec 25, 2019, 12:01 PM IST

मुंबई - नागरिकत्व संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी) च्या विरोधात देशभरात तीव्र विरोध होत आहे. मात्र, काही ठिकाणी या कायद्याला समर्थन देखील असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही या कायद्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. राज्यात काही ठिकाणी कायद्याच्या विरोधात तर काही ठिकाणी समर्थनार्थ मोर्चे निघाले. शेगाव, लातूर, भिवंडी, जालना, भोकरदन, नांदेड, कल्याण, अर्धापूर, इस्लामपूर, नाशिक याठिकाणी मोर्चे काढण्यात आले.

हेही वाचा... #CAA : स्थलांतरितांसाठी नरेंद्र मोदी हे 'देवा'प्रमाणे, शिवराज सिंह चौहान बरळले

नागरिकता सुधारणा कायद्याला शेगावात कडाडून विरोध

भारतीय संविधानाचा मूळ गाभा असलेल्या एकात्मतेला डावलून बहुमताच्या आणि सत्तेच्या जोरावर भाजप सरकारने नागरिकता सुधारणा विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर केले, असा आरोप करत बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात अनेक राजकीय पक्षांसह विविध संघटनांच्या वतीने भव्य अशा मूकमोर्चाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. राष्ट्रपतींनी हा कायदा लागू करण्यापूर्वी या कायद्याचे स्वयंमूल्यमापन करून निर्णय घ्यावा, अशी विनंती करीत या कायद्याच्या विरोधात अतिशय शांत आणि शिस्तबद्धरीतीने मोर्चा काढण्यात आला.

नागरिकत्व कायद्याविरोधात लातुरात भव्य मोर्चा; शांततेचे दर्शन

लातूर शहरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा #CAA च्या विरोधात 'आम्ही लातूरकर' च्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. शहरातील गंजगोलाई ते तहसील कार्यालय दरम्यान काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने लातूरकरांनी सहभाग नोंदवला होता.

भिवंडीत एनआरसी व सीएबी विरोधात रिक्षा संघटनांचा बंद

केंद्र सरकारने देशभरात एनआरसी व सीएबी कायदा लागू केला. मात्र हा कायदा देशात हिंदू - मुस्लिम असा भेदभाव निर्माण करत आहे आणि संविधानाचे कलम १४ चे उल्लंघन करणारा आहे, असा आरोप करत सोमवारी भिवंडी शहरातील १९ रिक्षा संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढला. केंद्र शासनाच्या निर्णयाचा निषेध करीत हजारो रिक्षाचालकांनी रिक्षा बंद ठेवल्या. त्यामुळे प्रवाशांसह नागरिक, शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत.

जालन्यात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात रॅली

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ रविवारी काही राजकीय पक्ष, संघटना आणि संस्थांनी रॅली काढली होती. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी या कायद्याच्या विरोधात जालन्यात रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

NRC आणि CAA विरोधात भोकरदनमध्ये कडकडीत बंद

एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात सोमवारी भोकरदनमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच सर्व समाज बांधवांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. भोकरदन शहरातून ११० मीटर लांबीच्या तिरंगा ध्वजाची रॅली काढून मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नवीन तहसील कार्यालय पर्यंत शांततेत मोर्चा काढून कार्यालयाजवळ पोहोचल्यावर मोर्चाचा समारोप करण्यात आला.

हेही वाचा... राघोबादादा जरा आनंदीबाईला आवरा.. महिला शिवसैनिकांनी अमृता फडणवीसांच्या फोटोला मारले जोडे

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये विशाल मोर्चा

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये सोमवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विविध संघटना आणि संस्था सहभागी झाल्या होत्या. या मोर्चामध्ये तिरंगा ध्वजाची काढलेली रॅली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. भारत माता की जय घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी नांदेड शहर दणाणून सोडले.

कल्याण शहरात एनआरसी आणि सीएबी विरोधात हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावर

केंद्र सरकारने लागू केलेल्या एनआरसी व सीएबी कायद्याला विरोध करीत सोमवारी कल्याण शहरात हजारो आंदोलनकर्त्यांनी दुर्गाडी किल्ल्याच्या समोर एकत्र येऊन केंद्र शासनाच्या निर्णयाचा निषेधात मोर्चा काढला. केंद्र सरकारने लागू केलेले एनआरसी आणि सीएबी कायदा देशात हिंदू-मुस्लिम असा भेदभाव निर्माण करून संविधानाचे कलम १४ चे उल्लंघन करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

अर्धापुरात नागरिकता संशोधन विधेयकाच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा

केंद्र सरकारने पारित केले विधेयक भारतीय नागरिकांच्या विरोधात नसून परदेशातून आलेल्या घुसखोरांना प्रतिबंध घालण्यासाठी असल्याचे सांगत, या कायद्याच्या समर्थनार्थ अर्धापूर येथे हजारो नागरिकांनी सोमवारी मोर्चा काढला. तेसच या कायद्याच्या समर्थनार्थ तहसिलदारांमार्फत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले आहे.

केंद्राच्या एनआरसी आणि सीएए कायद्याविरोधात इस्लामपूरमध्ये मुस्लिम समाजाचा मोर्चा

केंद्र सरकारने नागरिकत्व संशोधन कायदा मंजूर केला. हा कायदा देशात धर्मावर आधारित भेदभावाला खतपाणी घालणारा आहे, असा आरोप करत सोमवारी इस्लामपूरमध्ये मुस्लिम समाजाने कायद्याच्या विरोधात भव्य मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकरांकडून केंद्र सरकार विरोधात वाळवा तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले.

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनात नाशिकच्या रविवार कारंजा येथे निदर्शने

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनात नाशिकच्या रविवार कारजा येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी उपस्थितांना नागरिकत्व कायद्याबाबत माहिती देण्यात आली. नागरिकत्व कायद्यातील तरतुदीवरुन देशभरात ठिकठिकाणी कायद्याला विरोध केला जात आहे. मात्र नागरिकत्व कायद्यामुळे संविधानातील समानतेच्या तत्त्वाचे उल्लंघन होत नाही, असे सांगत 'आम्ही नाशिककर' यांच्या वतीने रविवार कारंजा परिसरात निदर्शने करण्यात आली.

भिवंडीत एनआरसी व सीएए विरोधात एमआयएमचा कँडल मार्च मोर्चा

केंद्र शासनाने लागू केलेल्या एनआरसी व सीएए कायद्याविरोधात सोमवारी सायंकाळी भिवंडी शहरात कँडल मार्च काढण्यात आला. एमआयएमचे शहर अध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या मार्गदर्शनाखाली या कँडल मार्च मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मार्च मोर्चात महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा... मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणांचे शिवसैनिकांकडून मुंडन

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Dec 25, 2019, 12:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.