ETV Bharat / city

Mumbai Crime नोकरी देण्याच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; महिलांना कोंडून मारहाण - Prostitution under employment guise

अनेक महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास जबरदस्ती केल्याची घटना नवी मुंबईतील नेरुळ ( prostitution in nerul area of New Mumbai ) येथे घडत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ( Action by Crime Branch of the Mumbai Police ) अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्षास मिळाली.

Mumbai Crime
Mumbai Crime
author img

By

Published : Aug 11, 2022, 11:04 PM IST

मुंबई : घरकामाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून ( Prostitution with lure of domestic work ) अनेक महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास जबरदस्ती केल्याची घटना नवी मुंबईतील नेरुळ ( prostitution in nerul area of New Mumbai ) येथे घडत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ( Action by Crime Branch of the Mumbai Police ) अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्षास मिळाली. त्यानुसार मुंबई पोलिसांनी कारवाई करून १७ महिलांची सुटका करून ९ दलालांना ताब्यात घेतले. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आझाद मैदान पोलिसात गुन्हा दाखल : ४ ऑगस्ट रोजी पीडित महिला फिर्यादी यांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई येथे येऊन तक्रार दिली की, नेरुळ परिसरात तसेच शिरोना गाव, जुई नगर, नवी मुंबई येथे राजू नावाचा इसम आणि त्याचा साथीदार साहिल हे महिलांना विविध राज्यातून घरकामाची नोकरी देतो असे अमिष दाखवून त्यांना नेरुळ, नवी मुंबई येथे बोलावून अज्ञात स्थळी कोंडून ठेवून, मारहाण करून तसेच धमकी देवून त्यांच्या इच्छेविरुद्ध विविध हॉटेल अथवा लॉजवर जबरदस्तीने गि-हाईक पाठवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत आहे. त्यातून मिळणाऱ्या पैशावर उपजिवीका करून वेश्याव्यवसाय चालवित असल्याचे सांगितले. याबाबत महिलेचा सविस्तर जबाब नोंद करुन घटना गांभीर्याने घेऊन आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

विविध ठिकाणी केली छापेमारी : मुंबई पोलिसांनी ४ टिम तयार करुन शिरोना गाव, नेरुळ, नवी मुंबई येथे जावून विविध ठिकाणी छापा टाकून कारवाईदरम्यान एकूण १७ पीडित महिला आणि ९ वेश्यादलाल यांना ताब्यात घेणे. तसेच एकूण रोख रक्कम ३७५०/- आणि अंदाजे किं.रु ५६०००/ चे विविध कंपनीचे ८ मोबाईल फोन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच या कारवाईत पीडित महिलांसह त्यांचा अल्पवयीन भाऊ यास सुरक्षिततेकरीता ताब्यात घेण्यात आले.

मुख्य आरोपी राजू आणि साहिल वॉन्टेड : पीडित मुलींना सुरक्षिततेकरीता महिला सुधारगृह येथे जमा करण्यात आले आहे. अटक आरोपीतांना न्यायालयात हजर केले असता १० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. मुख्य आरोपी राजू आणि साहिल वॉन्टेड असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

साहिल हा महिलांना विविध राज्यातून घरकामाची नोकरी देतो असे सांगून नवी मुंबईत बोलवायचा व त्यांच्याकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घ्यायचा. यापैकी एका पीडितेने तक्रार केल्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई करून १७ महिलांची सुटका करून ९ दलालांना ताब्यात घेतले. मुख्य आरोपी राजू आणि साहिल वॉन्टेड असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा- अश्लील व्हिडिओ बनवून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.